आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसची औरंगाबादेतून सद्भावना रॅली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रणजित देशमुख राज्यातील काँग्रेसचे दिवस वाईट असल्याने अस्वस्थ आहेत. त्यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन या बाबीकडे लक्ष वेधत राज्यात औरंगाबाद ते नागपूरपर्यंत राजीव गांधी स्मृतिप्रीत्यर्थ काँग्रेस कार्यकर्ता जोडो सद्भावना अभियान सुरू करण्याची परवानगी घेतली आहे. पक्षाकडून मला काहीही नको, असे सांगणारे देशमुख पश्चिम नागपूर येथून निवडणूक लढायला उत्सुक आहेत. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीत त्यांनी येथून तिकीटही मागितल्याचे वृत्त आहे.

असा असेल रॅलीचा प्रवास
320 ऑगस्टला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण औरंगाबादेत रॅलीला हिरवी झेंडी दाखवणार.
331 ऑगस्ट रोजी सोनिया गांधींच्या उपस्थितीत नागपुरात समारोप.
362 मतदारसंघांतून 3000 हजार किमींचा प्रवास 13 दिवसांत पूर्ण होणार.