आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसुंधरा-ललित मोदींचे व्यवसायिक संबंध, काँग्रेसने उघड केले 'धौलपूर' कनेक्शन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आयपीएलचे माजी आयुक्त आणि भ्रष्टाचाराचे आरोपी ललित मोदीची मदत केल्यामुळे वादग्रस्त ठरलेल्या राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यावर काँग्रेसने गंभीर आरोप केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी पत्रकार परिषदेत वसुंधरा आणि त्यांचे कुटुंबीय व ललित मोदी यांनी सरकारी महालावर कब्जा केल्याचा आरोप केला आहे. जयराम रमेश म्हणाले, 'धौलपूरचा महाल सरकरी संपत्ती असतानी वसुंधरा, त्यांचा मुलगा दुष्यंत आणि ललित मोदी यांनी तो हडपला आहे.'
जयराम रमेश म्हणाले- 2010 पर्यंत धौलपूरचा महाल होता सरकारी मालमत्ता
रमेश म्हणाले, ' 2010 पर्यंत सरकारी मालमत्ता असलेला धौलपूरचा महाल 2013 मध्ये वसुंधरा यांच्या शपथपत्रावर त्यांची खासगी संपत्ती असल्याचे दाखवण्यात आले.' ते म्हणाले, 'वसुंधरा यांच्या कुटुंबाची कंपनी नियंत आणि ललित मोदीची कंपनी आनंदा हेरिटेज या दोघांनी मिळून महालाला सरकारी मालमत्तेचे खासगी संपत्ती केले आणि त्यात 100 कोटींची गुंतवणूक केली. येथे सुरु करण्यात आलेल्या हॉटेलमध्ये वसुंधरा यांच्या नावे 3280 शेअर, 2025 शेअर दुष्यंत, 3225 शेअर निहारिका (वसुंधरा यांची सून) आणि ललित मोदीचे 515 शेअर आहेत.'
जयराम रमेश म्हणाले, की 1954, 1955, 1977,1980, 2010 या 60 वर्षांमध्ये जवळपास सहा वेळा धौलपूर महाल ही सरकारी मालमत्ता असल्याचे दस्तऐवजामध्ये नोंदवलेले आहे. 1980 मध्ये वसुंधरा राजे यांच्या पतीनेही महाल सरकारी मालमत्ता असल्याची कोर्टात साक्ष दिली होती. मात्र, राजस्थान सरकारने या महालाला खासगी मालमत्ता करुन ललित मोदीसोबत नफ्याचा उद्दोग सुरु केला आहे.
मोदींना दिले 'मौनेंद्र' नाव, म्हणाले - आता तरी मौन सोडा
काँग्रेसने वसुंधरा यांच्या प्रकरणावरुन पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींर निशाणा साधला. जयराम रमेश म्हणाले, की पंतप्रधानांनी आता तरी मौन सोडले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना मौनेंद्र हे नाव देत जयराम रमेश म्हमाले, आता तरी त्यांनी मौन सोडून वसुंधरा राजेंचा राजीनामा घेतला पाहिजे.