आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Secretory Digvijay Singh Comment On MP Mionakshi Natrajan

दिग्विजय सिंह पुन्हा घसरले; कॉंग्रेसच्या मीनाक्षी नटराजनबाबत अश्लील उद्‍गार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- वादग्रस्त वक्तव्य करण्यात प्रसिद्ध असलेले कॉंग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंह यांनी आपल्या पक्षालाच घरचा आहेर दिला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण देत असल्याच्या खळबळजनक वक्तव्य करून काही तास होत नाही तोच दिग्विजय सिंह यांनी कॉंग्रेसच्या महिला खासदार मीनाक्षी नटराजन यांच्याबाबत अश्लील उद्‍गार काढले आहे.
मध्य प्रदेशमधील मंदसौर येथील खासदार मीनाक्षी नटराजन यांची प्रशंसा करताना दिग्विजय सिंह यांची जीभ अक्षरश: घसरली. दिग्विजय सिंह मंदसौर येथे आयोजित करण्यात आलेल्या एका सभेत बोलत होते.

दिग्विजय यांच्या या विधानामुळे विरोधकांना टीका करण्याची आयती संधी चालून आली आहे. भाजपच्या प्रवक्त्या मीनाक्षी लेखी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, की यापूर्वीही दिग्विजय सिंह यांची जीभ अनेकदा घसरली आहे. मीनाक्षी नटराजन आणि कॉंग्रेसच्या स्पष्टीकरणानंतरच बोलू, असे लेखी म्हणाल्या. कॉंग्रेसने एक कार्यशाळा आयोजित करून त्यात नेत्यांना सत्य बोलणे तसेच संयमी भाषेत कसे बोलावे, याचे प्रशिक्षण दिले पाहिजे, अशी प्रतिक्रिया भाजपच्या नेत्या स्मृति ईरानी यांनी दिली आहे.