आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Secretory Digvijay Singh Comment On RSS And Batala Encounter Case

संघ देतो बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण,\'बाटला\' बनावटच- दिग्विजय सिंहांचा खळबळजनक दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ' बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण देत असल्याचा खळबळजनक दावा करून कॉंग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंह यांनी पुन्हा एकदा आरएसएसला टार्गेट केले आहे. याबाबत सन 1992 मधील पुरावेही त्यांच्याकडे असल्याचे सिंह यांनी सांगितले. तसेच दिल्लीतील बहुचर्चित बाटला हाऊस एन्काउंटर बनावटच असल्याचाही पुनरुच्चार सिंह यांनी केला आहे.

मध्य प्रदेशातील निमच येथे पत्रकारांशी बोलताना सिंह म्हणाले, 'सन1992 मध्ये निमच येथील संघाच्या सेवा भरती कार्यालयात बॉम्ब बनविले जात होते. त्यावेळी झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यूही झाला होता. मात्र, त्यावेळी भाजप सत्तेवर असल्याने ही प्रकरण दडपण्यात आले होते. परंतु 1993 मध्ये कॉंग्रेसची सत्ता आल्यानंतर या प्रकरणाची पुन्हा चौकशी सुरू करण्‍यात आली होती. खारगोव येथून संघाचा कार्यकर्ता कालू सिंह पथरोड याला अटक करण्यात आली होती.'' तसेच 2004 मध्ये महू येथे झालेल्या स्फोटांप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींनीही बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण संघाच्या प्रशिक्षण शिबिरात घेतल्याचे सांगितले होते,'

दिल्लीतील बहुचर्चित बाटला हाऊस एन्काउंटर बनावट नसल्याचा निर्णय आज (गुरुवार) साकेत कोर्टाने दिला. संशयित दहशतवादी शहजाद उर्फ पप्पू यानेच पोलिस निरीक्षक मोहनचंद्र शर्मा यांची हत्या केल्याचे कोर्टाने स्पष्ट केले आहे. कोर्टाच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देताना दिग्विजय सिंह म्हणाले, 'कोर्टाच्या‍ निर्णयाचे आपण स्वागत करतो. परंतु बाटला एन्काउटर बनावट असल्याचा पुनरुच्चार केला.