तिरुवनंतपुरम - काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांचे कौतुक करून काँग्रेस नेत्यांची नाराजी ओढवून घेतली आहे. शशी थरूर सातत्याने पक्षाच्या विचारधारेविरोधात बोलून पक्षशिस्तीचा भंग करत आहेत. त्यामुळे त्यांचे हे वर्तन पक्षाने गांभीर्याने घेतले आहे.
काँग्रेसच्या शिस्तपालन समितीचे प्रमुख ए. के. अँटनी यांनी थरूर यांना याआधीही शिस्त न मोडण्याचा सल्ला दिलेला होता. याच कारणामुळे त्यांना त्यांचे प्रवक्तेपद गमवावे लागले होते. परंतु त्यानंतरही थरूर यांचे मोदीप्रेम उफाळून येताना दिसत आहे. पक्षाचे प्रवक्ते पी. सी. चाको यांनी सांगितले की, थरूर यांनी बेजबाबदार काम केले आहे. मोदींचे कौतुक करणारे विधान करण्यासाठी ही वेळ योग्य नव्हती. पक्ष त्यांच्या विचारांशी सहमत नाही. पक्ष हे वक्तव्य गांभीर्याने घेणार आहे. थरूर यांनी कोलकाता लिटररी फेस्टिव्हलमध्ये बोलताना लोकसभा िनवडणुकीतील विजयानंतर मोदींनी त्यांचे कौतुक केल्याचे व त्यामुळे
आपण भारावलो होतो, असे म्हटले होते.
अर्थात सुनंदा थरूर हत्या प्रकरणात येत असलेल्या बातम्यांबाबत काँग्रेसने थरूर यांचे समर्थन करताना त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे आरोप नसल्याचे व त्यांना बदनाम केले जात असल्याचे म्हटले आहे.
सुनंदांचे व्हिसेरा सॅम्पल सुरक्षित
दिल्ली | पोलिस आयुक्त बी. एस. बस्सी यांनी सुनंदा थरूर यांचे व्हिसेरा सॅम्पल प्रिझर्व्हेशनच्या माध्यमातून सुरक्षित ठेवण्यात आल्याचे सांगितले. घटनेला वर्ष होऊन गेल्याने सॅम्पल खराब झाले आहे. त्यामुळे शरीरातील विषाची माहिती मिळणार नाही, असे म्हटले जात होते. पण बस्सी यांनी हे वृत्त फेटाळून लावले.
झाल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. सॅम्पल खराब झाल्याने त्यातील विषाबाबत माहिती मिळणार नाही, असे म्हटले जाते आहे. परंतु यात तथ्य नाही. व्हिसेरा सॅम्पल तपासणीसाठी अमेरिका अथवा ब्रिटनला लॅबमध्ये पाठवण्याची व्यवस्था केली जात आहे. लवकरच त्याबाबत निर्णय होईल.