आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Set Up Shadow Cabinet Committees, Ghero Government In Parliament

काँग्रेसने स्थापन केल्या शॅडो कॅबिनेट समित्या, संसदेत सरकारला घेरण्याची तयारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लोकसभेत काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळाले नाही. त्यामुळे २४ नोव्हेंबरपासून सुरू होणा-या हिवाळी अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसने सात शॅडो कॅबिनेट समित्या स्थापन केल्या आहेत.

पक्षाच्या एका नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, मोदी सरकार अनेक नवे कायदे तयार करण्याच्या तसेच यूपीए सरकारने केलेल्या कायद्यांत बदल करण्याच्या तयारीत आहे. काँग्रेसचे लोकसभेत केवळ ४४ खासदार असले तरी या समित्यांमार्फत आक्रमक विरोधी पक्षाची भूमिका पक्षाला बजवायची आहे. काँग्रेस वगळता इतर विरोधी पक्ष सरकारला घेरण्यासाठी एकत्र आले आहेत. आता काँग्रेसनेही शॅडो कॅबिनेट स्थापन केल्याने सरकारला एकत्रित विरोधकांचा सामना करावा लागेल, अशी चिन्हे आहेत. समितीमध्ये ए. के. अ‍ॅंटोनी, अश्विनीकुमार, राजीव सातव यांच्या गृह- संरक्षण -कायदा समिती, मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे रेल्वे, वीरप्पा मोईली यांच्याकडे अर्थ खात्याची समिती आहे.

ब्रिटनमध्ये आहे शॅडो मिनिस्टरची परंपरा : ब्रिटनच्या संसदेत अशी परंपरा आहे. तेथे प्रत्येक मंत्र्याच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी विरोधी पक्ष आपल्या एका खासदाराला शॅडो मिनिस्टर करतात.