आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधींनी चोरली मोदींची घोषणा ! \'मी नाही, आम्ही सर्व\' अभियान वादात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - तीन वर्षांपूर्वी गुजरात भाजपने 'मैं नहीं, हम'चा नारा दिला होता. आज (शुक्रवार) काँग्रेसने लोकसभा प्रचाराची सुरवात केली. त्यासाठी काँग्रेसच्यावतीने देण्यात आलेल्या जाहिरातीत सर्वात पुढे राहुल गांधी आहेत आणि त्यांच्याबाजूला काही लोक उभे आहेत. या जाहिरातीवर वरच्या बाजूला ' मी नाही, आम्ही सर्व' ही घोषणा आहे. हिंदी दैनिकांमधील जाहिरातीत 'मैं नहीं, हम' घोषणा आहे. ही जाहिरात शुक्रावारी देशातील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली आहे. त्यानंतर गुजरात भाजपने दिलेला नारा आणि काँग्रेसची जाहिरात इंटरनेटवर वेगाने पसरत आहे. या जाहिरातीवर काँग्रेसकडूने कोणीही बोलण्यास तयार नाही.
काँग्रेसच्या जाहिरनाम्यात काय असले पाहिजे हे जाणून घेण्यासाठी पक्षाचे उपाध्यक्ष आणि प्रचार प्रमुख राहुल गांधी सध्या देशाच्या विविध भागांचा दौरा करत आहेत. आज ते महाराष्ट्रातील वर्ध्यात आहेत.
तीन वर्षांपूर्वी मोदींनी दिली होती घोषणा
काँग्रेसने ज्या जाहिरातीने लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराचा प्रारंभ केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या चिंतन शिबीरात फेब्रुवारी 2011 मध्ये गुजरातमधील मेहसाणा येथे नरेंद्र मोदींनी ती घोषणा दिली होती. तेव्हा ते भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नव्हते.
काँग्रेसने याआधीही केला असा कारनामा
विरोधीपक्षांची घोषणा चोरण्याचे काम काँग्रेसने प्रथमच केलेले नाही. काँग्रेसच्या जाहीरातींवर याआधीही अक्षेप घेण्यात आलेले आहेत. गेल्या वर्षी गुजरात मध्ये काँग्रेस कडून देण्यात आलेल्या एका जाहीरातीत कुपोषित मुल दाखवण्यात आले होते आणि ते गुजरातमधील असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, ते छायाचित्र श्रीलंकेतील होते.

पुढील स्लाइडमध्ये, राहुल गांधींनी साधला स्थानिक स्वराज्य संस्था सदस्यांशी संवाद