आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Support To Arvind Kejriwal Led AAP A \'drama\', Reveals Sting Operation

बड्या उद्योगपतीने काँग्रेस - आपमध्ये डील घडवून आणली, नितीन गडकरींचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथग्रहण केल्यानतंर काही तासांतच भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी काँग्रेस आणि आपमध्ये डील झाल्याचा आरोप केला आहे. दिल्ली विधानसभा निवडणूकीचे प्रभारी राहिलेले गडकरी यांनी आप व काँग्रेसवर हल्ला करताना म्हटले आहे, की एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एका मोठ्या उद्योगपतीने दोन्ही पक्षांमध्ये डील घडवून आणली आहे. दुसरीकडे आपने गडकरींचे आरोप फेटाळून लावले आहेत तर, काँग्रेस नेते शकील अहमद यांनी गडकरींना राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन घालवण्यात कोणती डील झाली होती याचा त्यांनी आधी खुलासा करावा असा टोला हाणला आहे.

नितीन गडकरींनी आरोप केला आहे, की मला पूर्ण माहिती मिळाली आहे की आप आणि काँग्रेस यांच्यात एका हॉटेलमध्ये एका उद्योगपतीने डील घडवून आणली आहे. तिथे कोणी काय खालले आणि काय चर्चा झाली याची पूर्ण माहिती आहे. गडकरी म्हणाले मला एका उद्योगपतीनेच ही माहिती दिली आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठीच काँग्रेसने हा सौदा केला असल्याचेही ते म्हणाले.
केजरीवाल यांच्या शपथग्रहण समारंभाला भाजपचे डॉ. हर्षवर्धन उपस्थित होते. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर केलेल्या जाहीर भाषणात केजरीवाल यांनी डॉ. हर्षवर्धन यांची स्तुती केली. ते म्हणाले, तुम्ही अत्यंत चांगले व्यक्ती आहात. मी तुमचा आदर करतो. मात्र तुमच्या पक्षाबद्दल असे बोलण्याची मी धाडस करु शकत नाही.
केजरीवाल यांच्या सरकारला बाहेरुन पाठींबा देणा-या काँग्रेसचे एकही नेते शपथग्रहण सोहळ्याला उपस्थित नव्हते. एका आमदाराने काँग्रेसची नाराजी बोलून देखील दाखवली. ते म्हणाले, आम आदमी पार्टीने काँग्रेसच्या एकाही नेत्याला निमंत्रित केले नाही. हे चूकीचे आहे. हा आमच्या पक्षाचा अपमान आहे.