आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Third List Of Lok Sabha News In Marathi, Candidate, Aurangabad

औरंगाबादसह नांदेडचा उमेदवार अजून ठरेना, काँग्रेसची तिसरी यादी जाहीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - लोकसभेच्या 58 उमेदवारांची तिसरी यादी काँग्रेसने मंगळवारी जाहीर केली. यात महाराष्ट्रातील पुणे, लातूर, चंद्रपूर व पालघरचे उमेदवार जाहीर झाले. पुण्यात विद्यमान खासदार सुरेश कलमाडी यांचा पत्ता कट झाला असून, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व वनमंत्री पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजित कदम यांना या जागेवर तिकीट मिळाले आहे. लातुरात प्रायमरीजमध्ये विजयी झालेल्या दत्तात्रेय बनसोडे यांची उमेदवारी जाहीर झाली. चंद्रपुरात मंत्री संजय देवतळे, तर पालघरमध्ये राज्यमंत्री राजेंद्र गावीत उमेदवार आहेत. तिसर्‍या यादीपर्यंतही काँग्रेसला औरंगाबाद, नांदेड, यवतमाळचे उमेदवार ठरवता आलेले नाहीत.


औरंगाबादेतून मंत्री राजेंद्र दर्डा, उत्तमसिंह पवार, नितीन पाटील यांची नावे चर्चेत आहेत. नांदेडात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण किंवा त्यांच्या पत्नी अमिता यांच्या नावाची चर्चा आहे. यवतमाळ मतदारसंघाचा उमेदवारही अजून ठरलेला नाही. दरम्यान, आम आदमी पार्टीने सातव्या यादीत 26 उमेदवार जाहीर केले. यवतमाळमधून नरेश राठोड यांना उमेदवारी मिळाली. यवतमाळात शिवसेनेच्या भावना गवळी सध्या खासदार आहेत. त्यांचे विभक्त पती प्रशांत सुर्वेदेखील येथून मनसेतर्फे लढण्याच्या तयारीत आहेत.


0 चंद्रपूर : संजय देवतळे 0 पुणे : विश्वजित कदम
0 पालघर: राजेंद्र गावित 0लातूर : दत्तात्रेय बनसोडे