आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress To Mobilise Women's Unit To Corner Modi Government

20 लाख महिला कार्यकर्त्यांच्या मदतीने मोदींना घेरण्याची काँग्रेसची योजना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो : काँग्रेस अध्‍यक्षा सोनिया गांधी आणि त्यांचे पुत्र राहुल गांधी)

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मोठ्या पराभवानंतर काँग्रेस पुन्हा नव्या ताकदीने पक्ष उभा करण्याची तयारी करत आहे. त्यासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी एक योजना आखली आहे. धार्मिक हिंसाचाराच्या मुद्यावर एनडीए सरकारला घेरण्यासाठी 20 लाख महिला कार्यकर्त्यांना पुढे करण्याची ही योजना आहे.
महिला काँग्रेस अध्यक्षा शोभा ओझा यांच्या मते, धार्मिक हिंसाचार, महागाई आणि सुरक्षेसारखे मुद्दे महिलांवर सर्वाधिक प्रभाव टाकत असतात. धार्मिक हिंसाचाराच्या घटनांमध्येही महिलांनाच सर्वाधिक समस्यांना तोंड द्यावे लागले, असेही ओझा म्हणाल्या. राहुल गांधीनी नुकत्याच झालेल्या संसंदेच्या अधिवेशनातही धार्मिक हिंसाचाराच्या मुद्यावर आक्रमक भूमिका घेतली होती. सोनिया गांधींनीही नुकताच या मुद्यावरून भाजप सरकारवर हल्लाबोल केला होता.

काय आहे योजना?
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजे 20 ऑगस्ट रोजी दिल्लीमध्ये महिला काँग्रेसचा मेळावा नियोजित आहे. त्यात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी धार्मिक हिंसाचाराचा मुद्दा उचलू शकतात. त्याशिवाय महागाई, महिला सुरक्षा आणि महिला सबलीकरणासारख्या मुद्यावरही रान पेटवण्याचा प्रयत्न केला जाण्याची दाट शक्यता आहे. या मेळाव्यात देशभरातील सुमारे 8000 महिला प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
तालकटोरा स्टेडियममध्ये आयोजित केल्या जाणा-या या मेळाव्यानंतर महिला काँग्रेस कार्यकर्त्या जंतर-मंतर मग इंडिया गेटवर शक्ती प्रदर्शन करण्याची शक्यता आहे. त्यानंतर काँग्रेस महिला कार्यकर्त्या लहान लहान गट तयार करून देशभरात जिल्हा स्तरावर मोर्चा आणि धरणे आंदोलने करतील. या संपूर्ण आंदोलनात 20 लाखाहून अधिक महिला कार्यकर्त्यांना सहभागी करून घेण्याचा काँग्रेसचा विचार आहे. महिला काँग्रेसच्या मदतीने भाजप सरकारवर महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्नही केला जाणार आहे.