आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Unhappy Over Lata Mangeshkar Remarks About Narendra Modi

नरेंद्र मोदींचे गुणगान; लता दीदींवर काँग्रेस नाराज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- नरेंद्र मोदी यांची स्तुती करून त्यांना पंतप्रधानपदी पाहण्याची इच्छा जाहीरपणे बोलून दाखवणा-या गानकोकिळा लता मंगेशकर यांच्यावर काँग्रेसची मंडळी चांगलीच नाराज झाली आहे. मात्र, पक्षातून अजूनही सावध प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. मोदींसारख्या असंवेदनशील व्यक्तीबद्दल लतादीदींच्या तोंडून गौरवोद्गार ऐकून संपूर्ण देशाला वेदना होत आहेत, असे काँग्रेसचे प्रवक्ते भक्तचरण दास यांनी म्हटले आहे.

मोदी यांना पंतप्रधानपदी पाहण्याची इच्छा लतादीदींनी शुक्रवारी पुण्यात व्यक्त केली होती. त्यावर दास म्हणाले, देश लताजींचा आदर करतो. मोदींसारख्या असंवेदनशील व्यक्तीसाठी त्यांच्या तोंडून असे काही शब्द देशाला वेदना देणारे आहेत.

खरे कळल्यावर मत बदलेल : मोदी विकासाचे खोटे आकडे देऊन धर्मनिरपेक्षतेचे ढोंग करतात. लताजींना यातील सत्य कळेल तेव्हा मोदींविषयी त्यांचे मत बदलेल, असे काँग्रेसचे सचिन सावंत यांनी म्हटले आहे. दरम्यान, काँग्रेसचे आणखी एक प्रवक्ते मीम अफजल म्हणाले, कला-संस्कृतीच्या क्षेत्रातील मंडळी गर्दी खेचू शकतात. मते मिळवण्यासाठी ते लोकांना बाध्य करू शकत नाहीत.

मृतांच्या नातलगांचे मोदींकडून सांत्वन

पाटणा । भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी एक आठवड्यात दुस-यांदा बिहारचा दौरा केला. गेल्या रविवारी हुंकार रॅलीदरम्यान बॉम्बस्फोटांत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांची शनिवारी भेट घेऊन त्यांनी सांत्वन केले. आपल्या सभेला उपस्थित बिहारी जनतेचे धैर्य व संयम कौतुकास्पद असल्याचे मोदी म्हणाले. स्फोटांत सहा जण मारले गेले होते. पाटणा, केमूर, बेगुसराय आणि नालंदा येथे जाऊन त्यांनी सांत्वन केले व प्रत्येकी 5 लाखांची मदत देऊ केली.