आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Urged To Election Commission To Delay In Code Of Conduct

निवडणुकीच्या घोषणेपासूनच आचारसंहिता नको, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दि्ल्ली - केंद्रीतील यूपीए सरकारला सार्वत्रिक निवडणुकीआधी काही कामे पूर्ण करुन घ्यायाची आहेत. त्यामुळेच काँग्रेसने निवडणूक आयोगाला निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यासोबतच आचार संहिता लागू करु नये असे पत्र लिहिले आहे. निवडणूकीच्या अधिसुचनेपासून आचारासंहिता लागू करावी अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे.
काँग्रस महासचिव जनार्दन द्विवेदी यांनी आयोगाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, 'सध्या निवडणुका या अनेक टप्प्यांमध्ये होतात. जवळपास सहा आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त आचारसंहिता लागू राहील. यामुळे विकास कामांना खिळ बसते.' काँग्रेसच्या या पत्राच्या आधारे संसदीय मंडळाने अहवाल तयार केला आहे.
भाजपचा विरोध
काँग्रेसने निवडणूक आयोगाला यासंबंधी सर्व पक्षीय बैठक बोलावण्याची मागणी केली आहे. मात्र, यावर निवडणूक आयोगाने आपले म्हणणे स्पष्ट केलेले नाही. भारतीय जनता पक्षाने काँग्रेसच्या या मागणीच्या विरोधी भूमिका घेतली आहे. यूपीए सरकारला थोडा देखील वेळ मिळू नये, अशी भाजपची भूमिका आहे.
सोमवारपासून भारत निर्माणची जाहिरात होणार बंद
यूपीए सरकारच्या योजना आणि कार्याची गाथा सांगणारी 'भारत निर्माण'ची जाहिरात सोमवारपासून बंद होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा एक दोन दिवसांमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जाहिराती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व टीव्ही चॅनल्स, दुरदर्शन, आकाशवाणी आणि एफएम रेडिओ यांना 2 मार्च पासून भारत निर्माणच्या जाहिराती बंद करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. वृत्तपत्रांतूनही या जाहिराती झळकणार नाहीत.