भाजप नेते म्हणाले, राजकारणात काहीच पार्ट टाइम नसते
भारतीय जनता पक्षाने काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या सुटीवर काँग्रेसला चिमटा काढत म्हटले आहे, की राजकारणात काहीच पार्ट टाइम नसते. भाजप प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले, 'पॉलिटिक्समध्ये काहीच पार्ट टाइम नसते. एवढे दिवस एक नेता, एका मतदारसंघाचा खासदार सुटी कशी काय घेऊ शकतो. त्यांना कळाले पाहिजे की
आपल्यावर एका लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आहे.'
शिवसेनेचे नेते राज्यसभा खासदार संजय राऊत म्हणाले, 'राहुल गांधी मंथन करायला गेले असे सांगितले जात होते. आता देशाला उत्सूकता आहे, की या मंथनातून ते काय घेऊन आले आहेत.'
फोटो - राहुल गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला.