आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Vice President Rahul Gandhi Meets Farmers From Different States

तब्बल 2 महिन्यांनंतर दिसले राहुल गांधी; शेतकर्‍यांसाठी पदयात्रा काढणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: शेतकर्‍यांशी संवाद साधताना कॉंग्रेसचे उपाध्यक्षा राहुल गांधी)
नवी दिल्ली- 59 दिवसांच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर मायदेशी परतलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (शनिवारी) आपल्या निवासस्थानी विविध राज्यांतील शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेल्या वादग्रस्त भू-संपादन विधेयकाविषयी शेतकर्‍यांची मते जाणून घेतली. शेतकर्‍यांच्या हक्कासाठी भूसंपादन विधेयकांचा मुद्दा संसदेत मांडणार आहे. देशातील शेतकर्‍यांच्या हक्कांसाठी आपण संसदेपर्यंत पदयात्रा काढणार असल्याचे आश्वासन राहुल गांधी यांनी शेतकर्‍यांना दिले.

मोदी सरकारच्या प्रस्तावित भूसंपादन कायद्याच्या निषेधार्थ काँग्रेसने उद्या (रविवारी) 'किसान-खेत मजदूर' रॅलीचे आयोजन केले आहे. रॅलीच्या एक दिवसआधीच राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, पंजाब आणि मध्य प्रदेशातील विविध शेतकरी संघटनांच्या सदस्यांशी चर्चा केली. यावेळी कॉंग्रेसचे ज्येष्‍ठ नेते जयराम रमेश आणि दिग्विजय सिंह उपस्थित होते.
'किसान- खेत मजदूर' रॅलीला यशस्वी करण्‍यासाठी कॉंग्रेसने पूर्ण तयारी केली आहे. कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी या रॅलीत संबोधित करतील. मोदी सरकारविरोधात आयोजित या रॅलीत सहभागी होण्यासाठी लाखों शेतकर्‍यांना राजधानीत आणण्‍याची कॉंग्रेसने व्यवस्था केली आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, शेतकर्‍यांसोबत संवाद साधताना राहुल गांधींचे फोटो...