आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गॅस महाग, महागले रेशन; आता बंद करा भाषण किंवा रिकामे करा सिंहासन - राहुल गांधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी महागाईच्या मुद्यावरून पीएम मोदींच्या नेतृत्वातील सरकारवर बरसले आहेत. त्यांनी रविवारी ट्विट करून बेरोजगारी आणि महागाईच्या मुद्यावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. सर्व काही महागले असताना नुसती भाषणे दिली जात आहेत. जनतेला पोकळ भाषणे नको आहेत. तुमच्याकडून महागाई आणि बेरोजगारी आटोक्यात येत नसेल तर खुर्ची रिकामी करा असेही राहुल गांधी म्हणाले आहेत. 
 
16 महिन्यांत LPG च्या किमती 19 वेळा वाढल्या
- राहुल गांधींनी ट्वीट करून त्याला एक अहवाल जोडला आहे. यात त्यांनी वाढत्या महागाईवरून थेट मोदींवर निशाणा साधला. त्यांनी केलेल्या ट्विटनुसार, गेल्या 16 महिन्यांत एलपीजी गॅसच्या किमती 19 वेळा वाढवण्यात आल्या आहेत. पेट्रोलच्या किमती तर सातत्त्याने वाढत आहेत. याचा फटका थेट सर्वसामान्यांच्या बटेजवर बसतो. 
- विशेष म्हणजे, याच महिन्याच्या सुरुवातीला सब्सिडीच्या गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये 4.50 रुपये आणि बिगर सवलतीच्या टाकीवर प्रत्येकी 93 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 
- राहुल गांधी अगदी काव्यात्मक लेखणीनूतन मोदी सरकारवर टीका केली. "गॅस महाग, महागले रॅशन; आता बंद करा भाषण किंवा रिकामे करा सिंहासन" असे राहुल यांनी ट्विट केले आहे.
 
बातम्या आणखी आहेत...