आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Voice President Rahul Gandhi Critics On Pm Narandra Modi News In Marathi

दिवसाढवळ्या येतो सुटा-बुटातील चोर; राहुल गांधींची मोदींवर टीका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भूसंपादन विधेयकावरून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नाव न घेता जोरदार टीकास्त्र सोडले. सोव्हिएत युनियनमधून काम करून परतलेल्या एका अर्थशास्त्रज्ञाचा हवाला देत राहुल म्हणाले की, चोर रात्रीच येतो, लपून येतो. खिडकीतून उडी मारून येतो, असे मला वाटत होते. परंतु सर्वात मोठे चोर दिवसाढवळ्याच येतात आणि ते सूट-बूट घालून असतात, असे मला कळले आहे, असे राहुल म्हणाले.
तत्पूर्वी विरोधकांच्या गोंधळातच लोकसभेत विधेयक सादर करण्यात आले. राहुल यांच्या नेतृत्वात सर्व विरोधकांनी त्याला विरोध केला. शिवसेना आणि अकाली दलानेही साथ दिली. नंतर ते विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवले.
राहुल म्हणाले की, सरकार बुंदेलखंड, राजस्थानच्या वाळवंटात भूसंपादन करत नाही. गुडगाव, नोएडा किंवा पुण्याजवळच करते. भारतातील शेतकऱ्यांनो तुमच्या पायाखाली सोने आहे. हे लोक ते सोने हिसकावू पाहत आहेत. तुमच्याकडून एकराने घेतलेली जमीन उद्या चौरस फुटाच्या भावाने कोट्यवधीत विकली जाईल. सरकार ती जमीन आपल्या उद्योगपती मित्रांना देऊ पाहत आहे.
पुढील स्लाइडवर वाचा, राहुलना कॉर्पोरेटचाच कळवळा : स्मृती