आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल म्हणाले- \'अच्छे दिन\'वाल्या सरकारने वाटोळे केले, PM नी शेतकऱ्यांशी बोलावे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बऱ्याच दिवसांनी लोकसभेत आपली भूमिका मांडली. शेतकऱ्यांची वाईट अवस्था असल्याचे सांगून राहुल यांनी मोदी सरकारला सुटबुटवाली सरकार असे म्हटले. 'अच्छे दिन'वाल्या सरकारने देशाचे वाटोळे केले आहे. पंतप्रधानांनी शेतकऱ्यांसी संवाद साधावा, असेही राहुल म्हणाले.
राहुल गांधी काय म्हणाले-
एनडीएच्या सरकारने खरेच अच्छे दिन आणले आहेत, असे म्हणत राहुल यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. गडकरी या सरकारमधील एकमेव असे नेते आहेत, जे मनापासून बोलतात. गडकरी यांनी म्हटले होते, की शेतकऱ्यांची मदत केंद्र सरकारच नव्हे तर देवही करु शकत नाही. राहुल म्हणाले, की मी पंतप्रधानांना एक छोटीशी सूचना करतो. देशाचे सर्वांत मोठे कृषी एक्सपर्ट म्हणतात, की 14 राज्यांमध्ये 180, 000 हेक्टरमधील शेतकरी संकटात आहेत. 4000 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. पण पंतप्रधान म्हणतात, की केवळ 1,06,000 हेक्टर शेती संकटात आली आहे. आता कृषिमंत्रालय म्हणत आहे, की 80,000 हेक्टरवरच्या शेतीला नुकसान पोहोचले आहे. पंतप्रधान स्वतः दौरा करुन शेतकऱ्यांची संवाद का साधत नाहीत? शेतकरी खत मिळण्यासाठी पोलिसांच्या लाठ्या खात आहेत. यावेळी कॉंग्रेसचे काही खासदार म्हणत होते, की पंतप्रधानांना विदेश दौऱ्यातून अतिरिक्त वेळ मिळत नाहीये.
राहुल गांधी म्हणाले, की भाजपचे नेते अनेक प्रकारची भाषा करीत आहेत. आम्हाला माहित आहे, की हे उद्योगपतींचे सरकार आहे. मोठ्या लोकांचे सरकार आहे. सुटबुटवाल्यांचे सरकार आहे. राहुल यांनी सुटबुटाचा उल्लेख केल्यावर भाजपच्या खासदारांनी जोरदार गोंधळ घातला. त्यानंतर राहुल म्हणाले, की आता मी सुटाबद्दल बोलणार नाही. बस. झाले तुमचे समाधान. त्यानंतर बोलताना राहुल बऱ्याच वेळा म्हणाले, की तुमचे पंतप्रधान. जेव्हा भाजपच्या खासदारांनी त्यावर आक्षेप घेतला तेव्हा राहुल म्हणाले, की तुमचे नाही. देशाचे पंतप्रधान. पंतप्रधानांना मी आणखी एक सल्ला देतो, की ही मोठ्या लोकांचे सरकार आहे. देशात 60 टक्के शेतकरी-मजूर वर्ग आहे. मला वाटते, की पंतप्रधानांनी साईड बदलावी. तुम्ही खुप मोठी चुक करीत आहात. शेतकऱ्यांचे नुकसान करीत आहात. भविष्यात ते तुम्हाला नुकसान पोहोचवतील. मोठमोठ्या गाड्या असताता अशा लोकांकडे ताकद असते, हा तुमचा गैरसमज आहे.