आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress VP Rahul Gandhi Was Sleeping In Lok Sabha During Discussion

लोकसभेत महत्त्वाच्या चर्चेच्या वेळी सुखाची झोप घेताना राहुल गांधी, PHOTO व्हायरल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- एकिकडे आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदी यांना बेकायदेशीर मदत केल्याप्रकरणी कॉंग्रेसने विरोधी पक्षांचे नेतृत्व करीत सरकारला धारेवर धरले आहे तर दुसरीकडे कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी या महत्त्वाच्या विषयावर लोकसभेत चर्चा सुरु असताना सुखाची झोप घेताना दिसले आहेत. सोशल मीडियावर हा फोटो मोठ्या प्रमाणावर शेअर केल्या जात आहे. यात उजव्या बाजूला खाली कालची तारखही दिसते. फोटोत राहुल गांधी यांच्या शेजारी कॉंग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे सरकारला प्रश्न विचारताना दिसत आहेत.
गेल्या वर्षीय असाच फोटो झाला होता व्हायरल
लोकसभेत महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुरु असताना राहुल गांधी यांचा सुखाची झोप घेतानाचा फोटो पहिल्यांदाच समोर आलेला नाही. 9 जुलै 2014 रोजी लोकसभेत महागाईच्या विषयांवर चर्चा सुरु असताना राहुल गांधी डुलकी घेताना दिसले होते. तो फोटो त्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
सोशल मीडियातून राहुल यांच्या डुलकीवर टीका
@pramodvr
पार्लमेंटमध्ये राहुल गांधी यांचा हा सेल्फ डिक्लेअर स्पीपिंग अवर आहे.
@WovenFabric
पार्लमेंटमध्ये खुप चर्चा सुरु असते... तोपर्यंत मी जरा लुटकी घेतो...
पुढील स्लाईडवर बघा, 2015 मधील या फोटोत राहुल गांधी लोकसभेत डुलकी घेताना दिसले होते....