आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस - समाजवादी पक्षाचे लिव्ह-इन तुटण्याच्या मार्गावर ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लोकसभा निवडणूका जवळ येत आहेत तसे काँग्रेस आणि समाजवादी पक्षातील संबंधामध्ये कुटूता निर्माण होऊ लागली आहे. समाजवादी पक्ष काँग्रेस प्रणित युपीए आघाडी सरकारमध्ये नाही मात्र वेळोवेळी त्यांचा सरकारला पाठिंबाही राहिला आहे. त्यामुळे काँग्रेस-सपामधील लिव्ह-इन-रिलेशनशिप संपुष्टात येताना दिसत आहे. दिवाळीच्या दिवशी तसा बॉम्ब सपचे प्रवक्ते राजेद्र चौधरी यांनी फोडला आहे. दुसरीकडे तिस-या आघाडीच्या तयारीत मुलायमसिंह सर्वात पुढे आहेत. त्यामुळेही आगामी निवडणूकीनंतर ते काँग्रेससोबत राहितील याबाबत साशंकताच आहे.
केंद्र सरकार उत्तर प्रदेशच्या हक्काचा निधीही मो्ठ्या कष्टाने देते असा आरोप चौधरी यांनी केला आहे. उत्तर प्रदेशच्या विकासात काँग्रेस प्रणित युपीए सरकार खोडा घालत असल्याचेही ते म्हणाले. केंद्र सरकार निधी देत नाही आणि काँग्रेस नेते राज्याचा विकास होत नसल्याची ओरड करतात, अशी उत्तर प्रदेश सरकारची कोंडी केली जात असल्याचे चौधरी म्हणाले.