नवी दिल्ली - गांधी कुटुंबातील तिन्ही सदस्यांनी पक्षाचे नेतृत्व करावे, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. प्रियंका गांधींवर नवी जबाबदारी टाकली जाणार, अशी चर्चा असतानाच काँग्रेसने ही भूमिका घेतली आहे. सोनिया पक्षाच्या अध्यक्ष, तर राहुल उपाध्यक्ष आहेत. प्रियंका गांधींना उत्तर प्रदेशच्या प्रभारी सरचिटणीस बनवले जाऊ शकते, अशी चर्चा आहे.
यावर पक्षाच्या प्रवक्त्या शोभा झा यांनी सांगितले की गांधी कुटुंबातील सदस्यांनी राजकारणात यावे, अशी पक्षातील सर्वांचीच इच्छा आहे. याआधी माजी मंत्री ऑस्कर फर्नांडिस यांनीही प्रियंकांनी सक्रिय राजकारणात यावे, असे विधान केले होते.