आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Constable Tej Bahadur Yadav Not Under Arrest, Voluntary Retirement Cancelled : BSF

खराब जेवणाची तक्रार करणाऱ्या जवानाचा VRS अडवला, पत्नीने लावला अटक केल्याचा आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीएसएफ जवान तेज बहादूर यांची पत्नी शर्मिलाने त्यांच्या अटकेचा आरोप लावला आहे. (फाइल) - Divya Marathi
बीएसएफ जवान तेज बहादूर यांची पत्नी शर्मिलाने त्यांच्या अटकेचा आरोप लावला आहे. (फाइल)
नवी दिल्ली - बीएसएफने जवानांना निकृष्ट दर्जाने जेवण दिले जात असल्याची तक्रार करणारा कॉन्सटेबल तेज बहादूरचा व्हिआरएस थांबवला आहे. त्यानंतर गुरुवारी त्यांच्या पत्नीने तेज बहादूरला बीएसएफने अटक केल्याचा आरोप केला आहे. बीएसएफने अटकेचे वृत्त फेटाळले असून तपास पूर्ण होईपर्यंत तेज बहादूर नोकरी सोडू शकत नसल्याचे स्पष्ट केले आहे. गेल्या महिन्यात जवानाचे काही व्हिडीओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले होते. त्यावर पीएमओने होम मिनिस्ट्रीकडे अहवाल मागवला होता. 

काय म्हणाले जवान आणि पत्नी... 
- न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार तेज बहादूरची पत्नी शर्मिला म्हणाली की, मी 31 जानेवारीला घरी त्यांची वाट पाहत होते. पण ते आलेच नाही. त्यांच्यावर निवृत्ती घेऊ नये म्हणून दबाव टाकला जात असल्याचे त्यांनी फोनवर सांगितले होते. 
- पतीने सांगितले की, तासाभरात त्यांचा व्हीआरएस रद्द केला आणि त्यांना अटक करण्यात आली. त्यांनी दुसऱ्याच्या फोनवरून फोन केला आणि मला कस्टडीत त्रास दिला जात आहे, असे सांगितल्याचे तेज बहादूरची पत्नी म्हणाली. 
- बीएसएफच्या सुत्रांनी सांगितले की, तेज बहादूरला अटक करण्यात आलेली नाही. तपासात ते दोषी आढळले आहेत. त्यांच्यावर कारवाईची शिफारस करण्यात आली आहे, मात्र त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. व्हीआरएस रद्द करण्याबाबत 30 जानेवारीच्या सायंकाळीच जवानाला सांगण्यात आले होते. 
- कॅगच्या गेल्यावर्षीच्या अहवालात असे म्हटले होते की, आर्मीच्या सर्वेक्षणात 68% जवान जेवण हे असमाधानकारक मानत असल्याचे समोर आले होते. सैनिकांना लो क्वालिटीचे मांस आणि भाजी दिली जाते. राशनही कमी असते. 

जवानाचा व्हिडीओ झाला व्हायरल 
- बीएसएफच्या 29 व्या बटालियनचा जवान तेज बहादूरचा व्हिडीओ गेल्या महिन्यात सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 
- त्यात जवानाने बीएसएफमध्ये कमी दर्जाचे जेवण दिल्याची तक्रार केली होती. त्यानंतर त्याला पदावरून काढून प्लंबरची ड्युटी दिली होती. 
- एका ऑडियो क्लिपमध्ये जवानाने म्हटले होते की, बीएसएफचे अधिकारी मला नेहमी शिस्त मोडल्याचा आरोपी म्हणतात. मग मला 14 अवॉर्ड कशासाठी देण्यात आले. 
- होम मिनिस्ट्रीने तपासाचे आदेश दिले. पीएमओनेही रिपोर्ट मागितला होता. योग्य तपासासाठी कमांडंट आणि सेकंड इन कमांडची बदली त्रिपुरा येथे करण्यात आली. 
- जवानांना राशन आणि इतर सुविधा पुरवण्याबाबतची जबाबदारी कमांडंट आणि सेकंड इन कमांडवर असते. 
- या गटनेनंतर आर्मी, बीएसएफ आणि सीआरपीएफ जवानांचही काही व्हिडीओ समोर आले. त्यात तक्रारींबरोबर सुविधआंची मागणीही करण्यात आली होती. 
 
पुढील स्लाइडवर पाहा, तेजबहादूरने सोशल साईटवर अपलोड केलेला व्हिडीओ...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...