आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Constitution Does Not Define The Word 'minorities': Govt

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यघटनेत अल्पसंख्याक शब्दाची व्याख्याच नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतीय राज्यघटनेमध्ये काही ठिकाणी अल्पसंख्याक शब्दाचा वापर केला आहे, मात्र त्यापेक्षा त्याची वेगळी व्याख्या करण्यात आली नाही, असे सरकारतर्फे सोमवारी स्पष्ट केले गेले.

राज्यघटनेमध्ये 29 ते 30 आणि 350 ए ते 350 ब कलमांमध्ये अल्पसंख्य किंवा अल्पसंख्याक शब्दप्रयोग केला आहे, त्यापेक्षा वेगळे काही नाही, असे अल्पसंख्याक विभागाचे मंत्री निनोंग इरिंग यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात सांगितले. कलम 29 मध्ये अल्पसंख्याक शब्दाचे शीर्षक आहे. मात्र, त्यासंबंधित नागरिकांचा गट, भाषा वा संस्कृतीचा कुठलाही उल्लेख केलेला नाही. बहुसंख्य समुदायांमध्ये ठरावीक समाज अल्पसंख्य ठरू शकतो. कलम 30 मध्ये धार्मिक व भाषिक अल्पसंख्याकांचा उल्लेख आहे. उर्वरित 350 अ व 350 ब कलमे केवळ भाषिक अल्पसंख्याकांशी संबंधित आहेत, असे इरिंग यांनी नमूद केले. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग अधिनियम 1992 च्या दुसर्‍या भागातील उपकलम ‘क’मध्ये 23 ऑक्टोबर 1993 च्या अधिसूचनेद्वारे मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध व पारशी आदी पाच समाजांची गणना अल्पसंख्याक समूहामध्ये केली आहे, असे इरिंग यांनी नमूद केले.