आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Constitutional Amendment To Annul SC Order On Quota In AIIMS Faculty

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एम्समधील आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी घटना दुरुस्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील (एम्स) सुपरस्पेशालिटी विभागातील प्रोफेसरच्या नियुक्ती प्रक्रियेत बजावलेला आरक्षणविरोधी आदेश मोडीत काढण्यासाठी विविध राजकीय पक्षांनी सरकारवर दबाव आणला. त्यामुळे सरकारला आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक घटना दुरुस्ती केली जाईल, असे आश्वासन दिले.

लोकसभा अध्यक्ष मीराकुमार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात एम्समधील आरक्षणाचा विषय चर्चेला घेतला. बहुतांश पक्षांनी घटना दुरुस्ती करण्याची मागणी केली. एम्समधील फॅकल्टीबाबत बजावलेला आदेश रद्द करण्याच्या मागणीसाठी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती विधिमंत्री कपिल सिब्बल यांनी दिली.

वाढत्या गदारोळात लोकसभा अध्यक्षांनी या विषयावर सरकारला घटना दुरुस्ती करण्याबाबत विचार करावा, अशी सूचना केली. या मुद्द्यावर सभागृह एकजूट असून यासंदर्भात विनाविलंब घटना दुरुस्ती विधेयक आणले जाईल, असे संसदीय कामकाज मंत्री कमलनाथ म्हणाले.