आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान आवास योजनेत यंदा 12 लाख घरांची निर्मिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत यंदाच्या चालू आर्थिक वर्षामध्ये शहरात १२ लाख घरे बांधण्याचे लक्ष्य सरकारने निश्चित केले आहे. मात्र, ३१ मार्चपर्यंतच्या आर्थिक वर्षात सरकारने या योजनेअंतर्गत १.४९ लाख घरेच बांधली आहेत.
 
एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, याेजनेअंतर्गत २०१८-१९ आणि २०१९-२० मध्ये प्रत्येकी २६ लाख घरे बांधण्याचे लक्ष्य आहे, तर २०२०-२१ मध्ये ३० आणि २०२१-२२- मध्ये २९.८० लाख घरे बांधण्याची योजना आहे. ते म्हणाले की, मागच्या आर्थिक वर्षात भूसंपादनात विलंब झाल्यामुळे या महत्त्वाच्या योजनेला गती नव्हती.
 
म्हणून २०१६-१७ मध्ये फक्त १.४९ लाख घरेच बांधली गेली. शिवाय आतापर्यंत १८.७६ लाख घरांच्या बांधकाम प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे.  १३.४६ लाख घरांच्या बांधकामासाठी अनुदान वितरित करण्यात आले आहे. केंद्र सरकारने जून २०१५ मध्ये पंतप्रधान शहरी आवास योजना आणली. या योजनेनुसार २०२२ पर्यंत देशातील सर्व नागरिकांना घर उपलब्ध करून देणे आहे.
 
बातम्या आणखी आहेत...