आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SEX स्कॅंडलपासून मर्डर केसपर्यंत, हे आहेत आपले \'पुजनीय\' बाबा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सध्या राधे मॉंचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. तोकडे कपडे घालणारी, सिनेमाच्या गाण्यांवर डान्स करणारी राधे मॉं सध्या फारच चर्चेत आहे. या पार्श्वभूमिवर आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय भारतातील वादग्रस्त बाबांची माहिती.
भारत हा विविध धर्म आणि संस्कृतींनी नटलेला देश आहे. याचा फायदा काही बाबा उचलत असतात. गेल्या काही महिन्यांमध्ये तर अशाच काही बाबांनी अगदी धुमाकुळ माजवला आहे. आसाराम असो, रामपाल असो किंवा नुकताच प्रकाशात आलेला किसिंग बाबा असो. या सर्वांनिच समाजाला अगदी वेठिस धरले आहे.
यातील काही बाबांवर बलात्काराचे तर काहींवर अगदी खुनाचे आरोप आहेत. काही बाबा गेल्या काही वर्षांपासून तुरुंगात आहेत. तरीही त्यांच्या भाविकांमध्ये जराही घट झालेली नाही. आजही लोक त्यांच्या दर्शनासाठी काहीही करतात. रस्त्यांवर अगदी लोटांगण घालतात.
नित्यानंद स्वामी
महिला भाविकांचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी हा बाबा चर्चेत आला होता. एका अनिवासी भारतीय महिलेने या बाबाविरुद्ध तक्रार दाखल केली होती. या दरम्यान, एक दाक्षिणात्य अभिनेत्री या बाबासोबत आक्षेपार्ह स्थितीत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात खुप लोकप्रिय ठरला होता. तरीही या बाबाची क्रेझ काही कमी झालेली नाही. या बाबाची 27 भाषेत तब्बल 300 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. युट्यूबवर सर्वांत मोठ्या प्रमाणावर बघितलेला गेलेला हा बाबा आहे.
पुढील स्लाईडवर बघा, भारतातील असे टॉप 10 वादग्रस्त बाबा... यांच्यावर आहेत अनेक गुन्हेगारी आरोप...