आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Controversial Book On Sonia Gandhi \'The Red Saree\' To Be Released In India

कॉंग्रेसच्या आक्षेपानंतरही सोनियांवरील वादग्रस्त \'द रेड साडी\' पुस्तक प्रकाशित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आयुष्यावर लिहिण्यात आलेले वादग्रस्त पुस्तक 'द रेड साडी' भारतात प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनामुळे भारतीय राजकारणात पुन्हा वादळ निर्माण होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. स्पॅनिश लेखक जेवियर मोरो असे या पुस्तकाच्या लेखकाचे नाव आहे.

या पुस्तकात सोनिया गांधी यांच्याशी निगडीत असलेल्या खासगी गोष्टींचा उल्लेख करण्यात आल्याने कॉंग्रेसचे नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी 2010 मध्ये या पुस्तकावर नाराजी व्यक्त केली होती.

सिंघवी यांच्या मते, 'पुस्तकात छापण्यात आलेले मुद्दे खोटे आणि अपमानकारक आहे' 'द रेड साडी' या पुस्तकामध्ये नेहरू-गांधी परिवाराबद्दल सखोल माहीती देण्यात आली आहे. यामध्ये मोतीलाल नेहरूंपासून ते सोनिया गांधी यांच्या 2004 मध्ये नाकारण्यात आलेले पंतप्रधानपद याचा उल्लेख करण्यात आला आहे. हे पुस्तक स्पॅनिश भाषेमध्ये 'अल सारी रोजो' नावाने 2008 मध्ये पहिल्यांदा प्रकाशित करण्यात आले होते. यानंतर 2010 मध्ये कॉंग्रेसतर्फे पुस्तकाचे लेखक जेवियर मोरो आणि प्रकाशक दोघांना कायदेशीर नोटिस पाठवण्यात आली होती. यानंतर भारतात 'द रेड साडी' या पुस्तकाच्या प्रकाशनावर बंदी घालण्यात आली होती.
या पुस्तकात इंदिरा गांधी यांचा पराभव आणि राजीव गांधी यांच्या हत्येनंतर गांधी परिवारातील वातावरणाचा उल्लेख करण्यावर कॉंग्रेस पक्षाचा आक्षेप होता. तर 1977 मध्ये इंदिरा गांधी यांच्या पराभवानंतर सोनिया गांधींना त्यांचे पती राजीव गांधी आणि मुलांना इटलीमध्ये घेवून जाण्याची इच्छा होती असा उल्लेख करण्यात आला होता यावर कॉंग्रेसचे नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी 2010 मध्ये नाराजी व्यक्त केली होती.