आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Controversial Kannada Actress Ramya Is Now Congress MP

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राम्या झाली खासदार, हॉट अभिनेत्रीने शपथविधीसाठी नेसली पारंपरिक साडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कर्नाटकातील मंड्या लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणूकीत कन्नड अभिनेत्री राम्या शनिवारी विजयी झाली. आज (सोमवार) तिने लोकसभेत पहिल्यांदा पाऊल ठेवले. काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढलेल्या राम्याने जनता दलाच्या (सेक्यूलर) सी.एस. पुट्टाराजू यांना 67 हजार मतांनी पराभूत केले. राम्याला 4 लाख 84 हजार 85 मते मिळाली तर, पट्टाराजू यांना 4 लाख 16 हजार 474 मते मिळाली होती.

लोकसभेत निवडून गेलेली ती पहिली कन्नड अभिनेत्री ठरली आहे. मंड्या हा जनता दल (सेक्यूलर)चा गड मानला जातो. या जागेवरून निवडून येणारी ती दुसरी काँग्रेस उमेदवार आहे. याआधी अभिनेता अंबरीश काँग्रेसच्या तिकीटावर येथे निवडून आला होता. अंबरीश सध्या कर्नाटक सरकारमध्ये मंत्री आहे.

राम्याने आज खासदार पदाची शपथ घेतली. ग्लॅमरस अंदाज आणि हॉट फोटोज् मुळे ती अनेकदा चर्चेत होती. आज तीने पारंपरिक सिल्क साडी परिधान केली होती.