आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Controversial Statement By Congress Leader Digvijay Singh

केजरीवाल म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रणनीतीचा एक भाग : दिग्विजय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमीच चर्चेत राहणाऱ्या दिग्विजय सिंह यांनी आता केजरीवाल आरएसएरच्या रणनीतीचा एक भाग असल्याचे म्हटले आहे. ट्विटरवर त्यांनी याबाबत पोस्ट केले आहे. आरएसएसच्या काँग्रेसमुक्त भारतासाठीच्या रणनीतीचा ते भाग असल्याचे त्यांनी ट्वीट केले आहे. या वक्तव्यामुळे आरएसएस आणि केजरीवाल दोघांच्या समर्थकांकडून आपल्यावर मोठ्या प्रमाणावर टीका होईल याची जाणीव अशल्याचेही दिग्विजय म्हणाले आहेत.

दिग्विजय म्हणाले की, आप आरएसएसच्या रणनीतीचा एक भाग आहे, असे माझे पूर्वीपासूनचे मत आहे. मला 2010 पासून ते माहिती आहे. केजरीवाल यांचा हिंदु राष्ट्राच्या मुद्याला दुजोरा आहे का? धर्मांतरासारख्या मुद्यावर ते काही बोलत का नाहीत ? अल्पसंख्यकांचा सामाजिक स्तर उंचावण्याची त्यांची इच्छा आहे का ? दिल्लीत दंगली झाल्या त्याठिकाणी ते का गेले नाहीत ? भाजपच्या धार्मिक मानिकसतेबाबत ते का बोलत नाहीत ? आपच्या जेवढ्या कार्यकर्त्यांनी पक्ष सोडला ते सर्व भाजपमध्ये का गेले? कोणीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला नाही. त्याचे कारण म्हणजे त्यांची मुख्य विचारसरणी भाजपशी संबंधित आहे.

राहुल गांधींना राबवायचे होते, केजरीवालप्रमाणे अभियान
दिल्लीत आपला मिळालेल्या यशाबाबत बोलताना दिग्वजय म्हणाले की, उपाध्यक्ष राहुल गांधी यांनाही केजरीवाल यांच्याप्रमाणे अभियान राबवायचे होते.
पण त्यांना मंजुरी मिळाली नाही. त्यामुळेच दिल्लीत काँग्रेसची एवढी वाईट अवस्था झाली आहे. आप सध्या दिल्लीत काँग्रेसच्याच नव्या रुपात आहे, असेही दिगविजय म्हणाले.

भ्रष्टाचाराबाबत केवळ भाषणबाजी...
भ्रष्टाचाराबाबत आप केवळ भाषणबाजी करत असल्याचेही दिग्विजय म्हणाले आहेत. भ्रष्टाचार हा सरकार आणि समाजाबरोबरच राजकीय पक्षांमध्येही पसरला आहे. सगळेच त्याच्या विरोधात सढा देत आहेत. पण तुम्ही अरविंद केजरीवाल यांच्या राजकीय विचारसरणी काय असे विचारता तेव्हा ते म्हणतात, आम्ही भ्रष्टाचारविरोधी आहोत. पण भ्रष्टाचारविरोधी सगळेच आहेत. मी दिल्लीच्या काँग्रेस कार्यकारिणीला आधीच सांगितले होते की, आप काँग्रेसच्या मतदारांना लक्ष्य करत आहे. पण त्यांना वाटले आपचा तोटा भाजपलाच अधिक होईल, असे त्यांना वाटले.

अशा वक्तव्यांचा आपलाच फायदा : आशुतोष
याबाबत प्रतिक्रिया देताना आपचे प्रवक्ते आशुतोष यांनीही ट्वीट केले आहे. दिग्विजय जेवढे आपच्या विरोधात बोलतील तेवढा आपला अधिक फायदा होईल असे आशुतोष यांनी पोस्ट केले आहे. काँग्रेसमध्ये सावरण्याची क्षमताच नसल्याचे यावरून दिसते असेही आशुतोष म्हणाले. काँग्रेस या स्थितीसाठी स्वतःच जबाबदार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.