आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेहरुजींचे होते लेडी एडविनावर प्रेम, मुलगी म्हणाली होती डॅडींना सगळे माहित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंडित जवाहरलाल नेहरु आणि लेडी एडविना माऊंटबेटन - Divya Marathi
पंडित जवाहरलाल नेहरु आणि लेडी एडविना माऊंटबेटन
14 नोव्हेंबर रोजी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंची जयंती आहे. भारत आज ज्या स्थानवर पोहोचला आहे त्यात पंडितजींचे योगदान फार मोठे आहे. त्यांच्या जयंतीनिमीत्त divyamarathi.com या मालिकेतून त्यांच्या आयुष्यातील पडद्याआडच्या गोष्टींची माहिती करुन देणार आहे.

नवी दिल्ली - पंडित जवाहरलाल नेहरुंबद्दल अनेक गोष्टी बोलल्या जातात. त्यातील सर्वात जास्त चर्चेत असलेली गोष्ट म्हणजे भारताचे शेवटचे व्हॉइसरॉय माऊंटबेटन यांची पत्नी एडविना आणि त्यांच्या संबंधाबद्दल. यात काहीच शंका नाही की नेहरु आणि लेडी एडविना माऊंटबेटन यांच्यात अतिशय निकटचे संबंध होते. दोघांचाही एकमेकांवर जीव होता. आजही या दोघांच्या संबंधाबद्दल अनेक वावड्या उठत असतात आणि हे संबंध कुठपर्यंत होते यावर चर्चा होते.
भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधी नेहरुंचे माऊंटबेटन यांच्याकडे नेहमी येणे-जाणे सुरु असायचे. तासन् तास त्यांच्याच चर्चा होत होत्या. याच भेटींमध्ये माऊंटबेटनची पत्नी एडविना आणि नेहरुंमध्ये आत्मीयता वाढीस लागली, जी भारताला स्वांतत्र्य मिळाल्यानंतर आणि पुढे नेहरुंच्या निधनापर्यंत कायम होती. नेहरु एडविनाला नियमित पत्र लिहित होते. त्यांच्या भेटी ब्रिटनमध्ये देखिल होत होत्या. एडविना वर्षांतून एक-दोन वेळा भारतात येत होत्या. तेव्हा त्यांचा मुक्काम दिल्लीतील तीनमूर्ती भवन येथे शासकीय पाहुण्या म्हणून असायचा. माऊंटबेटन आणि एडविना यांची मुलगी पामेलाने मान्य केले होते, की नेहरु आणि तिची आई एडविना एकमेकांना पसंत करत होते. काही वर्षांपूर्वी भारतीय पत्रकारांसमोर पामेलाने म्हटले होते, की 'दे आर इन लव्ह' (अर्थात- ते एकमेकांवर प्रेम करत होते) ती पुढे म्हणाली होती, त्यांच्यातील भावनिक गुंतवणूक आणि प्रेम लोकांना समजणे अवघड आहे. दोघेही खूप एकाकी होते. नेहरुंच्या पत्नीचे निधन झालेले होते. माऊंटबेटन कायम कामात व्यस्त असायचे. एडविना एक आत्ममग्न महिला होती. ती कोणासोबत फार बोलत नसे. मात्र जेव्हा ती नेहरुंसोबत बोलत होती तेव्हा आश्चर्य वाटायचे. भारत सोडल्यानंतरही त्यांच्यात वर्षातून एक-दोन वेळा भेट होत होती. हे माऊंटबेटन यांना माहित होते.

पंडितजींच्या सचिवाने काय लिहिले पुस्तकात
पंडित नेहरुंचे सचिव के.एफ.रुस्तम यांच्या डायरीतील काही संपादित भाग पुस्तकरुपाने प्रकाशित झाला आहे. त्यांनी नेहरु आणि एडविना यांच्या प्रेमाबद्दल लिहिले होते, की दोघेही अभिजात वर्गातिल होते. दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. नेहरुजींच्या महिलांविषयीच्या आत्मीयतेबद्दल त्यात खूप काही लिहिले आहे. रुस्तम लिहितात, की त्यांना महिलांची सोबत नक्कीच आवडत होती. या महिला प्रखर बुद्धीमत्तेच्या आणि प्रतिभावान होत्या. सरोजनी नायडूंची मुलगी पद्मजा आणि त्यांच्यात अतिशय जवळीक होती. ती नेहरुंची खूप काळजी घेत असायची. इंडियन समर - द सीक्रेट हिस्ट्री ऑफ द एंड ऑफ अॅन एम्पायर पुस्तकाचे लेखक अॅलेक्स वॉन टेजमन यांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते, की एकदा पद्मजाने रागारागात एडविनाचा फोटो फेकून दिला होता. मात्र नंतर त्या दोघींमध्ये चांगली मैत्री झाली होती. टेजमन यांच्यानुसार, नेहरुंना हुषार महिला आवडत होत्या.
श्रद्धा माता आणि मृणालिनी साराभाई
रुस्तम यांच्या डायरीत देशातील प्रसिद्ध नृत्यांगना मृणालिनी साराभाईचा उल्लेख आला आहे. नंतर त्या शास्त्रज्ञ होमी जहांगिर भाभा यांच्या पत्नी झाल्या. त्या देखिल नेहरुंच्या जवळच्या मानल्या जात. नेहरुंचे दुसरे सचिव एम.ओ.मथाई यांनी नेहरुंच्या जीवनात वाराणसीची एक महिला होती, याचा उल्लेख केला होता. कदाचित ती श्रद्धा माता होती. मथाईंचे म्हणणे होते, की ते एखाद्या प्लेबॉयपेक्षा कमी नव्हते. जेव्हा मथाईंनी 'रिमिनिसेंन्स' पुस्तक लिहिले तेव्हा त्यात एक अख्खे प्रकरण नेहरुंच्या जीवनात आलेल्या महिलांबद्दल होते. मात्र प्रकाशनाआधी ते काढण्यात आले. श्रद्धा माताचा उल्लेख नंतर देशातील प्रसिद्ध लेखक खुशवंतसिंग यांच्या पुस्तकातही आढळून येतो. ते जेव्हा श्रद्धा माताला भेटले तेव्हा तिने नेहरुंच्या निकट असल्याचा दावा केला होता. श्रद्धा माताकडे नेहरुंनी तिला लिहिलेली अनेक पत्रे होती. पंडित जवाहरलाल नेहरुंबद्दल अशी चर्चा नेहमीच होत आली आहे. त्यांच्या सोबत काम करणारे आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी जी पुस्तके लिहिली त्यात त्यांच्या महिला प्रेमाविषयींचे संकेत मिळतात.
(स्त्रोत - अहा ! जिंदगी, नोव्हेंबर 2015 च्या अंकात प्रकाशित दिल्लीचे वरिष्ठ पत्रकार संजय श्रीवास्तव यांच्या लेखाचा संपादित अंश)

पुढील स्लाइडमध्ये पाहा आणखी फोटोज्...