आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Controversial Talk On Bhim Rao Ambedkar In Jaipur Literature Festival

JLF: प्राध्यापक म्हणाले, आंबेडकरांनी केले तोडाफोडीचे राजकारण, देशाला गांधींची गरज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर- जयपूरमध्ये सुरु असलेल्या लिटरेचर फेस्टिवलमध्ये अभियांत्रिकी संस्था ट्रिपल आयटी हैदराबादचे प्राध्यापक नंदकिशोर आचार्य यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. आचार्य यांनी आज एका सत्रात बोलताना सांगितले की, ''गांधी यांनी नेहमीच देशाला जोडण्याचा प्रयत्न केला. तेच त्यांच्या राजकारणाचा मूळ हेतू होता. तर, आंबेडकर यांनी नेहमीच तोडण्याचे राजकारण केले. आंबेडकर नेहमीच दलिताबाबत मत व्यक्त करायचे तर गांधींनी सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जाण्याची भाषा केली. अशावेळी आपल्याला आंबेडकरांची नव्हे तर गांधी यांची गरज आहे.
आचार्य म्हणाले, जेव्हा सायमन कमिशनने मतदानाच्या अधिकाराबाबत चर्चा केली होती तेव्हा आंबेजकर यांनी सर्वांच्या समोर म्हटले होते की, आदिवासींना मतदानाचा अधिकार देऊ नये. कारण ते शिक्षित नाहीत. आता मला कोणी सांगेल का की दलितांच्या प्रश्नांबाबत आवाज उठविणारा माणूस आदिवासींच्या विरोधात कसे काय वागेल?.

उल्‍लेखनीय आहे की, जयपूर लिटरेचर फेस्टिवलमधील हे सत्र उद्घाटनाच्या दिवसापासूनच वादात अडकले आहे. पहिल्याच दिवशी राष्ट्रगीतावरून वाद झाला. ज्यात कोर्टाने आयोजकांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे, प्रसिद्ध गीतकार जावेद अख्‍तर आणि प्रसून जोशी यांच्या अश्लील चित्रपटातील गाणयावरून झालेली शाब्दिक बडबडही चर्चेत आली आहे. तिस-या दिवशी एक ब्रिटिश लेखक हनीफ कुरैशी यांनी भगवान शंकर, गणेश आणि शिवलिंग यांचे चित्रे असलेला टी-शर्ट घालून सेक्‍स रायटिंगवर आधारित एका सत्रातील चर्चेत भाग घेतला होता.