आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वादग्रस्त तीन दिग्गजांचे अनोळखी पैलू; सुब्रमण्यम यांना खटल्यापूर्वी श्लोक म्हणण्याची सवय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोपाल सुब्रमण्यम यांनी देशाचे सरन्यायाधीश आर. एम. लोढा यांच्या अध्यक्षतेखालील कॉलेजियमला आपल्या उमेदवारीची शिफारस मागे घेण्याचा आग्रह केला आहे.
गोपाल सुब्रमण्यम आईला दिलेल्या एका वचनामुळेच वकिली पेशात आले. वडिलांचे निधन झाले त्या वेळी ते घरातील एकमेव संतान होते. तू वकील व्हावे, असे स्वप्न तुझ्या वडिलांनी पाहिले होते इच्छा होती आणि तुला त्यांचे हे स्वप्न पूर्ण करावेच लागेल, असे त्या वेळी आईने त्यांना सांगितले होते. सुब्रमण्यम यांना इंग्रजी वाड्मयाचे प्राध्यापक व्हायचे होते, पण त्यांनी वकिली पेशा स्वीकारला. सोहराबुद्दीन हत्याकांड, स्वामी पद्मनाभ मंदिर आणि इतर प्रकरणांत एमिक्स क्युरी (न्याय मित्र) राहिलेले सुब्रमण्यम जेव्हा एखादा मोठा खटला घेण्याचा निर्णय करतात तेव्हा त्यापूर्वी ते जोरजोराने श्लोक म्हणतात. दिल्लीतील अत्याचार प्रकरणानंतर गठित वर्मा समितीत काम करताना ते फक्त तीन तास झोपत असत.