आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाराणसीत नरेंद्र मोदींना विरोध? गुजरात दंगलीचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर देशातील सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. निवडणूक जिंकण्यासाठी काही राजकीय पक्ष जुन्या कुरापतीही उकरून काढताना दिसत आहेत. अनेक वादग्रस्त मुद्यांच्या माध्यमातून एकमेकांशी संबंधित गोष्टी चव्हाट्यावर आणत आहेत. वाराणसीमध्येही काहीसा असाच प्रकार सुरु आहे.

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी वासाणसीमधूनच भविष्य आजमावत आहेत. मोदींना रोखण्यासाठी एक वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मोदींना वाराणसीत विरोध असल्याचे स्पष्ट जाणवत आहे.

अॅण्ड रायटर’ शीर्षक असलेल्याला हा व्हिडिओ सैय्यद मोहम्मद रकीम एसएम याने संपादीत केला आहे. व्हिडिओमध्ये गुजरात दंगलीच्या काळातील जळीत मृतदेह, जाळपोळ आणि दंगल पीडितांना दाखविण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) पदाधिकारी आणि नरेंद्र मोदी यांना कट्टर हिंदूत्त्ववादी म्हणून संबोधित करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे न्यायपालिकेशी संबंधित सांकेतिक व्हिडिओही दाखविण्यात आला आहे.

सर्व व्हिजुअल 'स्लाइड शो'मध्ये दाखविले आहेत. 'स्लाइड शो'च्या पार्श्वभागात 'गुजरात का मंजर हमने देखा है' असा आवाज देण्यात आला आहे.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा.. समाजवादी पक्षाचे नेते करताय व्हिडिओ शेअर...