आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'आप'ची आता 'खाप', भूषण यांची खरमरीत टीका, खेतान यांच्याबरोबरचा वाद शिगेला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आम आदमी पक्षातील (आप) मतभेद आणि वाद आता शिगेला पोहचले आहेत. प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांची हकालपट्टी झाल्यानंतर भूषण यांनी "आप' आता खाप पंचायत झाली असल्याची प्रखर टीका केली. तर पक्षाचे नेते व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे खंदे समर्थक आशिष खेतान यांनी शांती व प्रशांत भूषण या पितापुत्रांवर हल्लाबोल करत या दोघांनी ५००-७०० कोटींचे साम्राज्य कसे उभे केले, याची चौकशीच केली जाईल अशी घोषणा केली.

भूषण पिता-पुत्रांनी आपण प्रामाणिक नाहीत, नव्हतो हे जाहीरपणे सांगावे किंवा प्रामाणिकपणा सिद्ध करावा, असे आव्हान खेतान यांनी दिले. दुसरीकडे ज्येष्ठ नेते शांती भूषण यांनीही पक्षाला आव्हान दिले आहे. आपण "स्वराज संवाद'मध्येही सहभागी झालो होतो. तेव्हाच पक्षाने याबाबत नोटीस का दिली नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. प्रशांत यांनी आपमध्ये आता एक हुकूमशहा आणि इतर त्याचे आदेश पालन करणारे नोकर राहिले असल्याचे सांगत केजरीवाल यांच्यावर अप्रत्यक्ष वार केला.

खेतान पैसे घेऊन विविध नियतकालिकांत लेख लिहीत असल्याचा दावा प्रशांत भूषण यांनी सोमवारी केला होता. तहलकाने आयोजित केलेल्या साहित्य उत्सवासाठी एस्सारसारख्या कंपनीने ३ कोटी रुपये दिले होते. या बदल्यात तहलकामध्ये एस्सारची बाजू मांडणारा लेख प्रसिद्ध करण्यात आला होता. हा लेख खेतान यांनीच लहिला होता, असे भूषण म्हणाले होते.

बाबू मोरा नेहर छुटो...
योगेंद्र यादव यांनी "आप'मधून काढून टाकल्याच्या मुद्दयावर फेसबुकवर "पहिली प्रतिक्रिया' असे पोस्ट केले आहे. यात ते लिहितात, "रात्री बाराला पाच कमी होते. एका टीव्ही चॅनलचा फोन आला. त्यांनी पहिली प्रतिक्रिया विचारली. मग खूप काही मनात घोळत होते. सर्वात अगोदर राग येतो. हे कोण मला काढणारे? मग हलकेच मन दु:खी होते. आता के. एल. सेहगल यांचे गीत मनात घोळत राहते... बाबूल मोरा नेहर छुटो ही जाय...'

आता प्रेमाचा पाझर...
ज्या उदात्त भावनेतून इतक्या समविचारी लोकांना एकत्र करून एक घरटे उभारले ते क्षणात नष्ट होऊ नये, असे विचारही मनात घोळत राहतात...

नवे मॉडेल आणू
दरम्यान, योगेंद्र यादव यांनी मंगळवारी आपण पक्षाचे नवे मॉडेल उभे करू,असे जाहीर केले. मात्र, आपण मूळ आंदोलनाचा हेतू आणि ध्येय कायम ठेवू असेही ते म्हणाले.