आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'जवानांना सुट्या न दिल्यास ते अनैतिक व्यवहार व छेडछाडीस प्रवृत्त होतात\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- लष्करातील सैनिक आणि अधिका-यांना जर वेळेत सुट्या दिल्या नाहीत तर ते विवाहबाह्य संबंध करण्यास प्रवृत्त होतात. त्यामुळे त्यांच्याकडून अनैतिक व्यवहार किंवा छेडछाडीकडे यासारख्या गोष्टी घडू शकतात, असे लष्कराने म्हटले आहे. लष्कराने ही शंका व भीती एका अभ्यास पाहणीनंतर व्यक्त केली आहे.

या पाहणीचे नाव आहे ‘रोडमॅप टू प्रमोट डिग्निटी ऑफ विमेन एंड केयर फॉर गर्ल चाइल्ड इन आर्मी’. जयपुरस्थित 12 कोणार्क कोरने याबाबत अभ्यास करून हा अहवाल दिला आहे. सैनिकांना नियमित काळानंतर सुट्टी देण्याबरोबरच प्रशिक्षण आणि स्वयंशिस्ताचे धडे दिल्यास त्यांच्यातील नकरात्मक भावनांना रोखण्यास मदत करू शकते.
पाहणीतील अहवालानुसार, लष्करी अधिकारी किंवा सैनिक जेव्हा आपल्या कुटुंबियांपासून, पत्नीपासून वेगळे राहतात तेव्हा त्यांच्यात दुरावा निर्माण होतो. घरी सुट्टीला नियमित न गेल्यास जवानांच्या मनात विवाहबाह्य संबंध बनविण्याची इच्छा होती. तसेच सुट्टी न दिल्यास संबंध बनविण्याची इच्छा वाढते व त्याचकाळात त्यांच्याकडून अनैतिक व्यवहार होण्याचा धोका अधिक असतो. तसेच यामुळे छेडछाडीचे प्रकारही वाढतात.

जवानाच्या पत्नीवर सामूहिक बलात्कार- वाचा पुढे, क्लिक करा...