आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Controversy About Tribute To VHP Leader Ashok Singhal In The Delhi Assembly

सिंघलना श्रद्धांजली वाहण्यावरून दिल्ली विधानसभेत प्रचंड गोंधळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्ली विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी वातावरण तापले. विहिंप नेते अशोक सिंघल यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या मुद्द्यावरून प्रचंड गोंधळ झाला. भाजप आमदारांची ही मागणी आपच्या आमदारांनी विरोध करून हाणून पाडली. शेवटी सभापतींनीही श्रद्धांजली अर्पण करण्यास मंजुरी नाकारली.
पॅरिस हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली अर्पण करून अधिवशेनास प्रारंभ झाला. याच वेळी विरोधी पक्षनेते व भाजप आमदार विजेंदर गुप्ता यांनी अशोक सिंघल यांनाही सभागृहाने श्रद्धांजली अर्पण करावी, अशी मागणी केली. याला सत्ताधारी पक्षाच्या आमदारंनी तीव्र विरोध दर्शवला. दिल्ली विधानसभेत भाजपचे तीन आमदार असून तिन्ही आमदार या मुद्द्यावर आक्रमक झाले. अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्याच्या अभियानात सिंघल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, िशवाय जीवनभर त्यांनी त्याग केल्याचे भाजप आमदार म्हणाले. सभागृहाचे कामकाज सुरू झाले तेव्हा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सभागृहात नव्हते. उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया या वेळी उपस्थित होते. या अधिवेशनात देशातील असहिष्णुतेबद्दल होत असलेल्या आरोपांबाबतही चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. या मुद्द्यावर सभागृहात गोंधळ व पुन्हा आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे. याच मुद्द्यावर बिहार निवडणूक काळात केजरीवाल
यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली होती.
आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
भाजप आमदार एकीकडे आक्रमक होत असताना दुसरीकडे आपच्या आमदारांनी िसंघल मुद्द्यावरून भाजपवर जोरदार आरोप केले. या आरोप-प्रत्यारोपामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. यावर सभापती रामनिवास गोयल यांनी सिंघल कोणत्याही घटनात्मक पदावर नव्हते त्यामुळे सभागृहात श्रद्धांजली वाहता येणार नाही, असे जाहीर करत भाजप आमदारांची मागणी फेटाळली.