आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्र म्हणते ‘आप’चा सुब्रमण्यम आयोग अवैध अन् बेकायदाही, चौकशी थांबणार नाही- केजरीवाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्लीत आप सरकार केंद्र सरकार यांच्यात नवा वाद सुरू झाला आहे. डीडीसीए प्रकरणाच्या चौकशीसाठी आप सरकारने स्थापलेला सुब्रमण्यम आयोग अवैध, बेकायदा असल्याचे केंद्राने म्हटले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, ‘चौकशी आयोग कायद्यानुसार स्थापन केला आहे. केंद्राचे मत मान्य करण्यासाठी दिल्ली सरकार बाध्य नाही.
आयोग आपले काम सुरूच ठेवेल. नायब राज्यपाल अथवा पंतप्रधान कार्यालयाला त्याबाबत तक्रार असेल तर त्यांनी न्यायालयात जावे. न्यायालयच आयोगाचे काम रोखू शकेल.’नायब राज्यपाल नजीब जंग यांच्या कार्यालयाने गुरुवारी जारी केलेल्या पत्रात म्हटले होते की, गृह मंत्रालयाने दिल्ली सरकारच्या सतर्कता निदेशालयाची अधिसूचना घटनाबाह्य, अवैध आहे. त्यामुळे या आयोगाचा कुठलाही कायदेशीर प्रभाव नाही.
बातम्या आणखी आहेत...