आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समानतेची आवई, भिडले सरकारी जावई! अधिकाऱ्यांची आपसांत जुंपली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - श्रेष्ठत्व व वरचढपणासाठी भावाभावांत लागते तसेच भांडण सध्या आयएएस व आयआरएससारख्या केंद्र सरकारच्या अन्य सेवांतील अधिकाऱ्यांत जुंुपले आहे. वेतन समानता व करिअर प्रगतीवरून पेटलेले हे भांडण एवढे विकोपाला गेले की सोशल मीडियाच्या चव्हाट्यावर एकमेकांची जाहीर उणीदुणी सुरू आहेत.

आम्हीच कसे वेगळे आहोत, हे आयएएस सांगत आहेत. चार-दोन गुण जास्तीचे मिळाले म्हणून जीवनभर उच्च दर्जा व सवलतींचा वर्णभेद करायला नको, असे आयआरएस व अन्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सातवा वेतन आयोग केंद्राच्या सर्व सेवांत वेतन समानता आणण्याच्या विचारात आहे. त्यामुळे आयएएसचे श्रेष्ठत्व संपेल, अशी आवई उठल्याने हे भांडण सुरू झालेे. हा अहवाल अजून सादर झाला नाही आणि या प्रस्तावाला अधिकृत दुजोराही नाही. गुणवत्तेची कदरच होणार नसेल तर गुणवंत आकांक्षी आयएएसमध्ये कशाला येतील, असे आयएएस अधिकारी संघटनेचे सचिव संजय भूसरेड्डींचे म्हणणे आहे. तर एखादी सेवा तिला किती वेतन दिले हवेे,यासाठी आग्रह धरू शकते; पण इतरांना काय देऊ नये, असे म्हणू शकत नाही, असे आयपीएस असोसिएशनचे सचिव पी. व्ही. रामशास्त्रींंचेे मत आहे. ट्विटरवर #IASNoUsainBolt व #parity4allservices हे ट्रेंड्स जोरात आहेत. फेसबुकवरही प्रतिक्रियांचा महापूर सुरू आहे. या भांडणाला राजकीय पाठिंबाही मिळाला. ‘सर्वांना सर्वसमावेशक वाटले पाहिजे. अखिल भारतीय नागरी सेवांतील वेतनश्रेणी वर्णभेद संपुष्टात आलाच पाहिजे’ असे ट्विट भाजप नेत्या किरण बेदी यांनी केले आहे.
भेदाभेद कसा?
{आयएएस सेवेतील अधिकारी ११ वर्षांच्या सेवेनंतर सहसचिवाच्या पॅनलवर निवडला जातो. तर आयआरएस, अन्य सेवांतील अधिकाऱ्यांना त्यासाठी किमान १३ वर्षांची सेवा पूर्ण करावी लागते.
{लवकर पॅनलमध्ये समाविष्ट होत असल्यामुळे अन्य केंद्रीय सेवांतील बॅचमेटपेक्षा आयएएस अधिकाऱ्यांना उच्च वेतनश्रेणी आणि जास्तीचे अन्य आर्थिक लाभही मिळतात.
टिव टिव...
‘जागतिक दर्जाच्या सार्वजनिक वितरण प्रणालीसाठी भारतीय नागरी सेवांतील वर्णभेद संपुष्टात आणणे ही काळाची गरज आहे.
#parity4allservices....’
‘थोड्याशा गुणाने कोणी श्रेष्ठ ठरत नाही, असा दावा करणाऱ्यांनी या थोड्याच गुणांमुळे हजारो विद्यार्थी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होत नाहीत, हे विसरू नये. #IASNoUsainBolt ’