आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदूवरून खेर-थरूर जुंपली, अनुपम खेर म्हणाले हिंदू म्हणवण्याची भीती वाटते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- अभिनेते अनुपम खेर आणि काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्यात ‘हिंदू’च्या मुद्द्यावरून ट्विटरवर चांगलीच जुंपली. खेर यांनी थरूरांना काँग्रेसी चमचा म्हणून हिणवले.
खेर यांच्या मुलाखतीवरून हा वाद पेटला. त्यात खेर म्हणाले होते, ‘मला स्वत: हिंदू संबोधण्याची भीती वाटते. जर मी टिळा लावला, भगवे कपडे घातले तर मला संघाचा माणूस वा भाजपचा समर्थक ठरवले जाईल.’
त्यावर थरूर यांनी ट्विट केले की, ‘अनुपम मी नेहमी सांगतो, मी हिंदू असल्याबद्दल मला गर्व आहे. पण संघाच्या पठडीतील हिंदू असल्यासारखा नव्हे...’ त्यावर भडकलेल्या खेर यांनी थरूरांना उत्तर दिले की, ‘तुम्ही माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून काँग्रेसी चमच्याप्रमाणे वागाल, असे मला कधीही वाटले नव्हते.’ दुसरीकडे, खेर यांना यंदा पद्मभूषण मिळाल्याने ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांनीही तोंडसुख घेतले. ते म्हणाले, नरेंद्र मोदींची स्तुती केल्याशिवाय त्यांनी दुसरे काय काम केले आहे? पुरस्कार मिळवण्याचे काेणते गुण आहेत जे माझ्यात नाहीत?