आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याचिकाकर्ते म्हणाले, भ्रष्टाचार खूप आहे, वाईट वाटते; सरन्यायाधीशांचे उत्तर - राजकीय नेते बना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
याचिकेत CAG ला इन्कम टॅक्स विभागासारखे अधिकार देण्याची मागणी केली होती. - Divya Marathi
याचिकेत CAG ला इन्कम टॅक्स विभागासारखे अधिकार देण्याची मागणी केली होती.
नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टात सोमवारी एक विचित्र प्रकरण सुनावणीसाठी समोर आले. त्यात याचिकाकर्ते सुनील कुंडू आणि सरन्यायाधीश जे.एस. खेहर यांच्यात एक वेगळाच संवाद रंगला. सुनील यांनी कॅग (सीएजी)ला आयकर विभागाप्रमाणे अधिकार देण्याच्या मागणीसाठी जनहित याचिका दाखल केली होती. 

असा झाला संवाद... 
- सुनील म्हणाले, न्यायाधीश साहेब मी गरीब व्यक्ती आहे. मला स्वतःचे म्हणणे स्वतः मांडायचे आहे. मला इंग्रजी येत नाही, त्यामुळे मी माझे म्हणणे हिंदीमध्ये मांडू इच्छितो. 
- त्यानंतर याचिकाकर्त्याने म्हटले, सरकारने आयकर विभागाला दोषींवर थेट कारवाईचा अधिकार दिला आहे. तसेच अधिकार कॅगलाही द्यायला हवे. 
- सरन्यायाधीश म्हणाले, प्रत्येकाच्या काही मर्यादा असतात. सरकार आणि न्यायव्यवस्थेच्याही काही मर्यादा आहेत. कोणती संस्था काय काम करेल, कसे काम करेल त्यांना कोणते अधिकार असतील हे ठरवणे आमचे काम नाही. 

देशाची दूरवस्था बघवत नाही - याचिकाकर्ते
- त्यानंतर याचिकाकर्ते म्हणाले, सर देशात भ्रष्टाचार खूप वाढला आहे. तुम्ही जर काही केले नाही तर कसे चालेल. देश कुठे जात आहे. देशाची दूरवस्था पाहिली तर मला त्रास होतो. 
- चीफ जस्टिस म्हणाले, जर तुम्हाला एवढीच काळजी आहे तर तुम्ही निवडणूक का लढवत नाही? तुम्ही राजकीय नेते का बनत नाहीत. राजकीय नेते बना आणि मग देशाची सेवा करा. तुम्हाला हवा तसा देश घडवा. 
- याचिकाकर्ते म्हणाले, साहेब निवडणूक लढण्यासाठी आणि राजकीय नेते बनण्यासाठी पैसे लागतात. माझ्याकडे एवढा पैसा नाही. 
- चीफ जस्टिस म्हणाले, निवडणूक लढण्यासाठी पैसा असणे गरजेचे नाही. देशात असे अनेक उदाहरणे आहेत. एका दगड फोडणाऱ्या महिलेने विकासासाठी निवडणूक लढवली होती आणि ती खासदार बनली. तिच्याकडे तर दोन वेळच्या जेवणासाठीही पैसे नव्हते. तुम्ही निवडणूक लढा आणि राजकीय नेते बना. मग तुम्हाला ते सर्व करता येईल, ज्यासाठी तुम्ही कोर्टात आले आहात. 

पुन्हा अशी याचिका दाखल केली तर दंड ठोठावू 
- मुख्य न्यायाधीशांच्या नेतृत्त्वातील ३ न्यायाधीशांच्या पीठाने सुनील यांची याचिका फेटाळून लावत इशाराही दिला. तुम्ही प्रथमच याचिका दाखल केली आहे, त्यामुळे दंड ठोठावत नाही. पण जर भविष्यात अशा प्रकारची याचिका दाखल केली तर तुम्हाला दंड ठोठावला जाईल, असे सरन्यायाधीश म्हणाले. अशा याचिकांनी न्यायालयाचा वेळ वाया जातो. त्यानंतर याचिकाकर्ते कोर्टातून निघून गेले. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
 
 
बातम्या आणखी आहेत...