आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Conversion In Agra Families Caught Between Hindu And Muslim Zealots In Agra

आग्रा धर्मांतरवरुन संसदेत गदारोळ, मौलवींनी म्हणाले- ती कुटुंबे ना हिंदू ना मुस्लिम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/आग्रा - उत्तर प्रदेशात 200 मुस्लिमांच्या धर्मांतरानंतर त्यांची अवस्था बिकट झाली आहे. मुस्लिम धर्मगुरु त्यांच्यावर नाराज झाले आहेत. त्यांच्या वस्तीत जाऊन मौलवींनी धर्मांतर केलेली कुटुंब आता 'ना हिंदू आहेत ना मुस्लिम' राहिले असे म्हटले आहे. तर काही लोकांनी त्यांना धमकी दिली आहे, की जर पुन्हा मुस्लिम धर्मात प्रवेश केला तर हिंदू वस्तीतून त्यांना हाकलून लावण्यात येईल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (आरएसएस) संबंधीत बजरंग दल आणि आणखी एका संघटनेने सोमवारी कार्यक्रमाचे आयोजन करुन 60 कुटुंबांचे धर्मांतर करुन त्यांना हिंदू धर्मात आणले. या संघटनांनी याला घर वापसी असे नाव दिले आहे. त्यानंतर या कार्यक्रमात सहभागी झालेल्या दोन व्यक्तींनी आरोप केला आहे, की आम्हाला रेशन कार्ड, आधार कार्डचे प्रलोभन देण्यात आले होते.
दुसरीकडे संसदेतही दोन दिवसांपासून हा मुद्दा गाजत आहे. आज (गुरुवार) काँग्रेस नेते पी.एल.पुनिया यांनी नोटीस देऊन यावर चर्चेची मागणी केली. त्यानंतर या मुद्यावर सभागृहात गोंधळ झाला.
संसदेत गदारोळ
मुस्लिमांच्या कथित धर्मांतर प्रकरणी बुधवारी संसदेत कारवाईची मागणी करण्यात आली. गुरुवारी देखील हा मुद्या पुन्हा उपस्थित झाला. त्यावर संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू यांनी सरकार यावर चर्चा करण्यास तयार असल्याचे म्हटले.
लोकसभा आणि राज्यसभेत दोन्ही ठिकाणी खासदारांनी कथित धर्मांतराचा मुद्दा लावून धरत भाजपवर निशाणा साधला. तृणमूल नेते सुल्तान अहमद यांनी लोकसभेत हा मुद्दा उपस्थित केला. त्याने सभागृहात वृत्तपत्र झळकावत आग्रा येथे हे काय सुरु आहे, असा सवाल केला. मायावती म्हणाल्या, 'आपला देश राज्यघटनेवर चालतो आणि धर्मनिरपेक्षता त्याचा आधार आहे.' मायावती यांनी आरोप केला, की बजरंग दलाना मुस्लिम कुटुंबियांच्या अज्ञानाचा आणि गरीबीचा फायदा उचलला. त्यांनी इशारा दिला, की हे लवकर थांबवले नाही, तर याचे लोण संपूर्ण देशात पसरेल आणि धार्मिक तणाव निर्माण होईल.
काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी राज्यसभेत म्हणाले, की देशात जातिय आणि धार्मिक तणाव निर्माण होणार नाही, राज्यघटनेचे उल्लंघन होणार नाही. याचा देशातील जनतेला विश्वास देण्याची गरज आहे.

ख्रिसमसच्या दिवशी हिंदू संघटनांचा ‘घर वापसी’ कार्यक्रम
आग्र्यात झालेल्या धर्मांतर कार्यक्रम प्रकरणी एफआयआर दाखल झाला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव आलोक रंजन म्हणाले की, जबरदस्तीने धर्मांतर करण्यात आले, असे सिद्ध झाले तर आम्ही आयोजकांवर कारवाई करू. दरम्यान, धर्म जागरण समन्वय विभाग आणि बजरंग दल यांनी 25 डिसेंबरला अलिगडमध्ये ‘पुरखों की घर वापसी’ कार्यक्रमाची घोषणा केली आहे. संघटनेचे नेते राजेश्वर सिंह म्हणाले की, आम्ही 4000 ख्रिश्चन आणि 1000 मुस्लिमांना हिंदू धर्मात परत घेऊ.