आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाऊद नव्हे, आधी झाकीरला पकडा- शिवसेना; \'भारत वापसी\'ला नाईक घाबरला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/ मुंबई - मुस्लिम धर्मगुरु झाकीर नाईक भारतात परतण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशी माहिती आहे की, झाकीर नाईकची कसून चौकशी करण्याची तयारी मुंबई पोलिसांनी केली आहे. त्यालाच घाबरून आता त्याने परत येण्याचा प्लॅन तुर्तास टाळला असल्याचे समजते. दुसरीकडे, शिवसेनेने म्हटले आहे, 'मोदी सरकारने दाऊद इब्राहिमला पकडण्याऐवजी झाकीर नाईकवर लक्ष्य केंद्रीत केले पाहिजे. हा घरभेदी आहे.'

आयआरएफची पत्रकार परिषद रद्द...
दुसरीकडे, झाकीर नाईकची संघटना इसलामिक रिसर्च फाऊंडेशनची (आयआरएफ) मंगळवारी (12 जुलै) मुंबईत होणारी पत्रकार परिषद रद्द करण्यात आल्याचे वृत्त आहे.

अबू आझमींचा झाकीर नाईकला पाठिंबा...
समाजवादी पक्षाचे मुंबईचे नेते अबू आझामी यांनी झाकील नाईकला पाठींबा दिला. झाकीर यांनी कधीही दहशतवादाचा पुरस्कार केला नाही. झाकीर मागील अनेक वर्षांपासून गैरमुस्लिमांना इस्लामची शिकवण दिली. त्यांना प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे आझमी यांनी सांगितले.

बांगलादेशातील ढाक्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील अतिरेकी झाकीर यांचा फॉलोअर होता, असे म्हटले जाते आहे. मग मालेगाव ब्लास्टची आरोपी प्रज्ञासिंग ठाकूर कोणाची फॉलोअर होती? असा सवाल अबू आझमी यांनी उपस्थित केला आहे. प्रज्ञासिंग ठाकूर अभिनव भारत तसेच राष्‍ट्रीय स्वयंसेवक संघाची फॉलोअर नव्हती का? असे विचारत अबू आझमी यांनी म्हटले की, राजनाथ सिंह व प्रज्ञासिंग ठाकूर हे एका छायाचित्रात एकत्र दिसत आहे. मग राजनाथसिंह यांच्यावर का कारवाई झाली नाही.

रामदेव बाबांनी घेतले तोंडसुख...
योगगुरु रामदेव बाबा यांनी झाकीर नाईकप्रकरणी तोंडसुख घेतले. काही लोक धर्माच्या नावाखाली अधर्म करत आहेत. त्याच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी, अशी प्रतिक्रिया रामदेव यांनी दिली आहे.

बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये झालेल्या हल्ल्यात जे दहशतवादी होते, ते ज्या व्यक्तीपासून प्रभावित होते ती व्यक्ती म्हणजे झाकीर नाईक असल्याचे नुकतेच समोर आले आहे. बांगलादेशने त्याच्या भाषणांचे प्रसारण करणारा पीस टीव्ही देशात बंद केला आहे. भारतात 9 टीम त्याची चौकशी करत आहेत.
काय म्हणाली शिवसेना
शिवसेनेने त्यांचे मुखपत्र 'सामना'मध्ये सोमवारी म्हटले आहे, की केंद्र सरकारने दाऊद, मेनन ऐवजी आता झाकीर नाईकवर लक्ष्य केंद्रीत केले पाहिजे. हा घऱभेदी आहे. त्याला अटक करुन अजमल कसाबला जिथे ठेवलेह होते त्याच कोठडीत त्याची रवानगी झाली पाहिजे.
- ज्या प्रकारे पाकिस्तानात राहात असलेला अझहर मसूद खुलेआम गरळ ओकतो त्याच पद्धतीने झाकीर सारखे लोक शांततेच्या नावाखाली, समाजकार्याच्या आडून आपला उद्देश साध्य करत आहे.
- नाईक कित्येक वर्षांपासून देशविरोधी शक्तींना पाठबळ देत आहे, आता ढाकाच्या निमीत्ताने त्याच्या शांततेच्या संदेशामागील सत्य समोर आले आहे.

कोण आहे झाकीर नाईक
> डॉ. झाकीर नाईक याचा जन्म महाराष्ट्राची राजधानी मुबंईत 18 ऑक्टोबर 1965 मध्ये झाला.
> तो स्वतःला इस्लामचा प्रचारक आणि समकालिन धर्मांचे विश्लेषक असल्याचे सांगतो.
> झाकीर याचे शिक्षण मुंबईतील किशनचंद चेलाराम कॉलेजमधून झाले. त्याने एमबीबीएसचे शिक्षण टोपीवाला नॅशनल मेडीकल कॉलेजमधून पूर्ण केले.
> डॉ. नाईक यानी इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन नावाची संस्था स्थापन केली आहे. त्याशिवाय मुंबईतील इस्लामिक इंटरनॅशनल स्कुलची स्थापना केली. यूनायटेड इस्लामिक ऐडच्या माध्यमातून तो गरीब मुस्लिम विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत करत असल्याचे त्याच्या फाउंडेशनच्या वेबसाइटवर म्हटले आहे.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, पीस टीव्हीचे गौडबंगाल
> महिला सेक्स स्लेव्हबद्दल झाकीरचे मत
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...