आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केजरींवर भ्रष्टाचाराचा आरोप; 2 कोटी घेतल्याचा मिश्रांचा दावा, नायब राज्यपालांकडे तक्रार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातून नेतृत्व उदयास आल्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी आरूढ झालेले ‘आप’ नेते अरविंद केजरीवाल यांना सध्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनी घेरले आहे. मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आलेले कपिल मिश्रा यांनी रविवारी केजरींवर सत्येंद्र जैन यांच्याकडून २ कोटी रुपये रोख घेतल्याचा आरोप केला. गेल्या शुक्रवारी आपल्यासमोर हा व्यवहार झाल्याचा दावा मिश्रा यांनी केला आहे.

दरम्यान, मिश्रांनी केलेल्या आरोपानंतर दिल्लीत राजकीय वादळ उठले आहे. भाजप व काँग्रेस नेत्यांनी केजरींच्या राजीनाम्याची मागणी केली, तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरासमोर निदर्शने केली. या कार्यकर्त्यांना हुसकावून लावण्यासाठी पोलिसांनी पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर केला. दरम्यान, मिश्रा यांनी केलेले आरोप निराधार असून त्यावर स्पष्टीकरण देण्याची गरज नसल्याचे उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया म्हणाले.

नायब राज्यपालांकडे तक्रार...
गेल्या दोन वर्षांत केजरीवाल सरकारमध्ये झालेले घोटाळे व भ्रष्टाचाराबाबत आपण नायब राज्यपालांकडे तक्रार केली असल्याचे मिश्रा म्हणाले. दिल्लीतील टँकर घोटाळ्यातही बडी मंडळी असल्याचा दावा करून त्यांची नावे जाहीर करू, असे ते म्हणाले.

विश्वास यांनीही आरोप फेटाळले
सध्या केजरीवाल यांच्याविरुद्ध मैदानात उतरलेले कुमार विश्वास यांनीही मिश्रा यांचे आरोप फेटाळले आहेत.

मिश्रांचे असे दावे
सत्येंद्र जैन यांनीच मला सांगितले होते की त्यांनी केजरीवाल यांच्या एका नातेवाइकासाठी ५० कोटींचा भूखंड व्यवहार केला आहे. जैन यांच्यावर काळा पैसा व मनी लाँडरिंगचे आरोप आहेत. त्यांनी आपल्या नातेवाइकांना तसेच मुलीस मोठी पदे दिली असल्याचे मिश्रा यांचे म्हणणे आहे.

केजरींनी माझा अपेक्षाभंग केला : अण्णा
या आरोपांनंतर अण्णा हजारे यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले. भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात अग्रेसर राहिलेल्या केजरींवर असे आरोप व्हावेत हे दुर्दैवी आहे. केजरीवाल सरकारने माझा यापूर्वीच अपेक्षाभंग केला आहे, असे अण्णा म्हणाले. 
बातम्या आणखी आहेत...