आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माकपमुळे भंगले राहुल गांधींचे स्वप्न,भ्रष्टाचारविरोधी अध्यादेश कॅबिनेटने पुन्हा टाळले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मंजूर होऊ न शकलेल्या भ्रष्टाचारविरोधी सहा विधेयकांचा अध्यादेश काढण्याचे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे स्वप्न माकपने राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रामुळे भंगले. त्यामुळे रविवारी बोलावलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत अध्यादेश काढण्याला मंजुरी मिळाली नाही.


या बैठकीत आंध्र प्रदेश पुनर्रचना विधेयकाला मंजुरी दिली. त्याचबरोबर 13 जिल्ह्यांच्या आंध्र प्रदेशला पाच वर्षांसाठी विशेष राज्याचा दर्जा देण्याचे निर्देश नियोजन आयोगाला दिले. अनुसूचित जाती- जमाती (अत्याचार प्रतिबंधक ) सुधारणा अध्यादेशाला मंजुरी व जाट समाजाला मागासवर्गाचा दर्जा देण्यात आला.माकपचे नेते प्रकाश करात यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून भ्रष्टाचारविरोधी विधेयकांवर अध्यादेश काढणे लोकशाहीविरोधी आहे. राजकीय स्वार्थ साधण्यासाठी सत्ताधारी पक्ष अध्यादेश काढू इच्छिते, असे करात यांचे म्हटले होते.