आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दैनंदिन वापरातील वस्‍तूंवरील GST दर कमी होण्‍याची शक्‍यता, 10 नोव्‍हेंबर रोजी बैठक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली- दररोज वापरात येणा-या वस्‍तू जसे की, शॅम्‍पू, फर्नीचर, प्‍लास्‍टीकचे सामान यांच्‍यावरील जीएसटीचे दर कमी होण्‍याची शक्‍यता वर्तवण्‍यात येत आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांच्‍या अध्‍यक्षतेखाली होणा-या जीएसटी परेषदेमध्‍ये हा निर्णय घेतला जाऊ शकतो. 10 नोव्‍हेंबर रोजी ही परिषद होत आहे. सध्‍या रोज वापरात येणा-या अनेक वस्‍तूंवर 28% जीएसटी लावला जातो. त्‍याबद्दल या बैठकीत फेरविचार केला जाणार आहे. 1 जुलै रोजी देशभरात जीएसटी लागू झाल्‍यानंतर दर महिन्‍याला जीएसटी परिषदेची बैठक आयोजित केले जाते.
 
छोट्या व्‍यापा-यांना मिळू शकतो दिलासा
- सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनूसार, छोट्या व मध्‍यम व्‍यापा-यांवर लावण्‍यात येणा-या जीएसटीवरही फेरविचार केला जाऊ शकतो. हे दर कमी करुन त्‍यांना दिलासा देण्‍याचा प्रयत्‍न सरकारतर्फे केला जाऊ शकतो.
 
कारण काय?
पूर्वीच्‍या कर प्रणालीमध्‍ये या व्‍यापा-यांना अधिभार कर व मुल्‍यावर्धित कर हा कमी प्रमाणात लावला जायचा. मात्र जीएसटीमुळे त्‍यांच्‍यांवर आता जास्‍त भार पडत आहे.
 
किती प्रमाणात कमी करणार दर
- जीएसटीच्‍या 28% स्‍लॅबमध्‍ये असणा-या दैनंदिन वापरातील वस्‍तूंना 18% स्‍लॅबमध्‍ये आणण्‍याबद्दल सरकार विचार करु शकते. यामध्‍ये फर्निचर, इलेर्क्टिक स्विच, प्‍लास्‍टीक पाईप्‍स अशा वस्‍तूंचा समावेश आहे.
 
कारण काय?
- जीएसटीमध्‍ये प्रत्‍येक प्रकारच्‍या फर्नीचरवर 28% कर लावण्‍यात येतो. मध्‍यम कुटुंबे अशा फर्निचरचा सर्वाधिक वापर करतात. त्‍यामुळे त्‍यांच्‍यावरील जीएसटी दर कमी करण्‍यात यावा, अशी करण्‍यात येत होती.
- प्‍लास्‍टीकच्‍या काही वस्‍तूंवर 18% जीएसटी लागतो. जसे की, शॉवर बाथ, सिंक, वॉश बेसिन, सीट आणि कव्‍हर्स. मात्र सॅनिटरी वेयर्सवर 28% कर लावण्‍यात येतो. सरकारच्‍या या निर्णयावर बरीच टीकाही झाली आहे. त्‍यामुळे या निर्णयावर पुन्‍हा एकदा फेरविचार केला जाणार आहे.

28% स्‍लॅबमध्‍ये होऊ शकतो बदल
- सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनूसार, '28% स्‍लॅबमध्‍ये ज्‍या वस्‍तू आहेत त्‍यांच्‍याबद्दल फेरविचार करुन काही सुधारणा केले जाऊ शकतात. सामान्‍यांच्‍या दरारोजच्‍या वापराच्‍या ज्‍या वस्‍तूंचा 28% स्‍लॅबमध्ये समावेश आहे त्‍यांना 18% स्‍लॅबमध्‍ये आणले जाऊ शकते.'
    
 
 
   
बातम्या आणखी आहेत...