आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Election Result: उत्‍तरप्रदेशमध्‍ये \'हर हर मोदी\', पंजाबमध्‍ये काँग्रेस, वाचा संपूर्ण निकाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली -  पाच राज्‍याच्‍यां विधानसभा निवडणूकांमध्‍ये पंजाब आणि गोवा वगळता इतर राज्‍यांत भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. उत्‍तरप्रदेशमध्‍ये तब्‍बल 325 जागा जिंकत भाजपाने इतर पक्षांना अक्षरश: भूईसपाट केले आहे. उत्‍तराखंडमध्‍येही एकूण 70 जागांपैकी 57 जागा जिंकत भाजपने एकहाती सत्‍ता मिळविली आहे. 
 
पंजाबमध्‍ये काँग्रेसचे जोरदार कमबॅक, आपच्‍या स्‍वप्‍नांवर झाडू
विधानसभेच्‍या 117 जागांपैकी 77 जागांवर काँग्रेसला विजय मिळाला आहे. पंजाबवर काँग्रेसचा पंजाच उमटणार असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. भाजप, शिरोमणी अकालीदल यांच्‍या युतीला जेमतेम 18 जागां जिंकता आल्‍या. निकालांपूर्वींच्‍या एक्‍झीट पोलमध्‍ये पंजाबमध्‍ये आप पक्षाला सर्वाधिक जागा मिळू शकतात, असे भाकीत वर्तविले जात होते. मात्र काँग्रेसने अापच्‍या स्‍वप्‍नांवरही झाडू फिरवला आहे. पंजाबमधील काँग्रेसचे नेते कॅप्‍टन अमरिंदर सिंग सत्‍तास्‍थापनेसाठी लवकरच राज्‍यपालांची भेट घेणार आहे.    
 
निकाल 
उत्तर प्रदेश 
 
पक्ष भाजप सपा-काँग्रेस बसपा इतर
जागा 325 54 19 05
 

निकाल 

पंजाब
पक्ष अकाली-भाजप काँग्रेस आप इतर
जागा 18 77 20
 
02
 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमधील निकालांची Tally..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...