आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

65 वा प्रजासत्ताक दिन: भारताने जगाला दाखविली आपली ताकद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आज 26 जानेवारी, भारताचा 65 वा प्रजासत्ताक दिन आज देशभर जल्लोषात साजरा होत आहे. या निमित्ताने राजधानी दिल्लीसह मुंबई व देशभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राजधानी दिल्लीत राजपथवर होत असलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग ध्वजारोहण केले. या कार्यक्रमासाठी जपानचे पंतप्रधान शिबो आबे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यापूर्वी सर्व राज्यांचे विविधतेने नटलेले चित्ररथाचे संचलन करण्यात आले.
दुसरीकडे, मुंबईतही आज प्रथमच मरीन ड्राईव्हवर प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रम पार पडला. यावेळी हवाई हल्ल्याचा धोका असल्याने कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. त्याचबरोबर संपूर्ण मरिन ड्राईव्हचा परिसर नो फ्लाइंग झोन म्हणून घोषित करण्यात आला होता. राजधानी दिल्ली प्रमाणेच मुंबईतही विविध चित्ररथ यावेळी मुंबईकरांना पाहायला मिळाले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राज्यपाल के. शंकरनारायणन उपस्थित होते.
10:45 AM: मिसाईल, गाइडेड लेजर बॉम्बयुक्त तेजस राजपथावर
10:40 AM: डीआरडीओेचे पथक राजपथवरून
10:38 AM: 12-12 जवानांच्या वायुसेनेच्या पथकाचे राष्ट्रगीत
10:20 AM: नेव्हीचा ब्रास बॅंड राजपथवर, 27 वेळा प्रजासत्ताक दिन सोहळ्यात सहभाग, जगातील सहावी नौसेना ताकद
10:15 AM: सिख लाइट इंफेट्री राजपथावर
10:40 AM: गोरखा रायफलचे जवान राजपथावर, आठ गोरखा रेजीमेंट आहेत भारतात
10:35 AM: महार रेजिमेंटचा जवान राजपथावर, शिवाजीच्या काळापासून आहे रेजीमेंट
10:30 AM: देशातील सगळ्यात जुनी रेजीमेंट मद्रास रेजिमेंटचे संचलन
10:15 AM: राष्ट्रपती यांनी शहीदांना मरणोत्तर अशोक चक्र सम्मानाने गौरव केला
10:10 AM: सर्वानी आदराने राष्ट्रगीत गायले
10:00 AM: राष्ट्रपती, पंतप्रधान मनमोहन सिंह, उपराष्ट्रपती हामिद अन्सारी आणि प्रमुख पाहुणे राजपथवर पोहचले
09:55 AM: शहीदांना श्रद्धांजली देण्यासाठी दोन मिनिटे मौन
9:50 AM: पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी अमर जवान ज्योतीवर जाऊन शहिदांना आदरांजली अर्पित
9:45 AM: संरक्षणमंत्री ए. के एंटनी अमर जवान ज्योतीवर पोहचले
तीनही दलाचे सेना प्रमुख इंडिया गेट स्थित अमर जवान ज्योतीवर पोहचले