आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Country's Fifty Percent Women, 70 Percent Children Suffered Anamic

देशातील निम्म्या महिला, 70 टक्के मुले अ‍ॅनिमिकने त्रस्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कुपोषणाची निश्चित स्थिती समजण्यायोग्य आकडेवारी न ठेवल्याबद्दल संसदीय समितीने सरकारला फटकारले आहे. याबरोबर 2005-06 पर्यंत सहा महिने ते पाच वर्षांपर्यंत वयाची 70 टक्के मुले आणि 15 ते 49 वयोगटातील निम्म्यापेक्षा जास्त महिलांना अ‍ॅनिमिया झाल्याचे आढळून आले आहे.


केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाच्या लोकसभेतील समितीने 26 वा अहवाल सादर केला. यामध्ये कुपोषणावर सात वर्षांमध्ये नवी आकडेवारी सादर करण्यात न आल्याबद्दल सरकारला फटकारले. राष्‍ट्रीय कौटुंबिक आरोग्याच्या सर्वेक्षणातील ही आकडेवारी होती. 2005-06 मध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले होते.


कॉँग्रेसचे फ्रांिन्सस्को सरदिन्हा यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या अहवालात कुपोषण सामाजिक तसेच आर्थिक विकासासाठी मोठा धोका असल्याचे सांगितले आहे. यामुळे देशातील मुले, प्रौढ महिला, पुरुषांच्या कार्यक्षमतेवर प्रतिकूल परिणाम होतो. लहान मुलांच्या आहारावर लक्ष ठेवणा-या अंगणवाड्या संगणकीकृत का करण्यात आल्या नाहीत, अशी विचारणा करण्यात आली. महिला व बालविकास मंत्रालयाने या विषयावर कालबद्ध कार्यक्रम आखण्याची सूचना करण्यात आली.


काय आहे अहवालात?
०1988-89 मध्ये अ‍ॅनिमियाग्रस्त सहा महिने ते तीन वर्षांपर्यंतच्या मुलांची टक्केवारी 74 होती. 2005-06 मध्ये त्यात वाढ होऊन 80 टक्के झाली.
०रक्ताची कमतरता असलेल्या विवाहित व गरोदर महिला 52 आणि 50 टक्के होत्या. यात वाढ होऊन अनुक्रमे 56 व 60 टक्के झाल्या.
०2011 मध्ये 42 टक्के मुले अंडरवेट होती. यामध्ये 2004 पासून सुधारणा झाली आहे. त्या वेळी अशा मुलांची टक्केवारी 53 पेक्षाही जास्त होती.
०उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, ओडिशा, झारखंड आणि राजस्थानमध्ये मुलांच्या आरोग्याची स्थिती सर्वात वाईट होती.
०बालमृत्यू दर कमी करण्यात सरकारला अपयश आले. 2012-13 मध्ये जिवंत जन्मणा-या बाळांचा मृत्युदर प्रतिहजार 30 पर्यंत आणावयाचा होता. ऑक्टोबर 2012 पर्यंत हा 44 वर आला.
०14 हजार अंगणवाड्या मोकळ्या जागेत चालवल्या जातात. अनेक ठिकाणी शौचालयाची सोय नाही.