आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकच्या गोळीबारात दांपत्य ठार, 3 जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पाकिस्तानी लष्कराने शनिवारी सकाळी पूंछमध्ये एलओसीजवळील चौक्या आणि रहिवासी भागात गोळीबार केला. यात सुट्टीवर घरी आलेल्या प्रादेशिक लष्कराचे जवान मोहंमद शौकत आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. त्यांच्या ३ मुली जखमी झाल्या आहेत. भारताने पाकला चोख प्रत्युत्तर दिले.
 
लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, पाकिस्तानी लष्कराने शनिवारी सकाळी साडेसहा वाजता एलओसीवर अंदाधुंद गोळीबार व तोफगोळ्यांचा मारा सुरू केला. एका तोफगोळ्याचा कर्मारा गावातील जवान शौकत यांच्या घराजवळ स्फोट झाला. यात शौकत आणि त्यांची पत्नी सफियाबी ठार झाले. त्यांच्या तीन मुली झायदा कौसर (६), रुबिना (१२) आणि नाजियाबी यांच्यासह अनेक जण जखमी झाले.
बातम्या आणखी आहेत...