आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'लिव-इन\'मध्ये राहणा-या दांपत्याला विवाहबद्ध समजले जाईल -सुप्रीम कोर्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- बऱ्याच काळापर्यंत 'लिव-इन'मध्ये राहणाऱ्या दांपत्याला विवाहबद्ध समजले जाईल, असा महत्त्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. या दांपत्यातील पुरुषाचा मृत्यू झाला तर महिलेला त्याच्या संपत्तीवर हक्क सांगण्याचा अधिकार असल्याचेही कोर्टाने स्पष्ट केले आहे.
सातत्याने शारीरिक संबंध प्रस्थापित करून एकत्र राहणार्‍या दांपत्याला न्यायालय विवाहीत समजणार आहे. मात्र संबंधित दांपत्य कायदेशीर विवाहीत नसल्याचा पुरावा सादर करण्‍याचा दोघांपैकी कोणत्याही पक्षाला अधिकार असल्याचेही सुप्रीम कोर्टाचे न्यायाधिश एम. वाय. इकबाल आणि न्यायाधिश अमिताव रॉय यांच्या खंडपीठाने म्हटले आहे.
दरम्यान, सुप्रीम कोर्टाने 2010 मध्येदेखील अशा प्रकारचा एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला होता. 'लिव-इन'मध्ये राहणाऱ्या दांपत्यातील महिलेला पत्नीचा दर्जा प्राप्त होतो, असे न्यायालयाने म्हटले होते.
संपत्तीच्या विवादातील खटल्यावर सुनावणी करताना न्यायालयाने हा निकाल दिला आहे. यासंदर्भात याचिकाकर्त्याने म्हटले होते की, आजीच्या मृत्यूनंतर माझे आजोबा एका महिलेसोबत 20 वर्षे 'लिव-इन'मध्ये होते. आजोबांच्या मृत्यूनंतर संपत्तीत या महिलेला वाटा देता येणार नाही.
याचिकाकर्त्याच्या आजोबांचे संबंधित महिलेसोबत शारीरिक संबंध होते. त्यामुळे न्यायालयाने या महिलेला पत्नीचा दर्जा दिला आहे. सध्या ही महिला याचिकाकर्त्या कुटुंबासोबत राहात आहे.