आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरविंद केजरीवालांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भाजप नेते नितीन गडकरी यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात न्यायालयाने आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना 21 मे रोजी हजर राहण्याचे आदेश बजावले. लोकसभा निवडणूक प्रचारात व्यग्र असल्याचे कारण देत केजरीवाल सोमवारच्या सुनावणीस गैरहजर राहिले. यानंतर न्यायालयाने वरील निर्देश दिले. तत्पूर्वी केजरीवाल यांच्या वकिलांनी गैरहजर राहण्याची मुभा द्यावी, अशी विनंती महानगर दंडाधिकारी गोमती मनोच यांच्याकडे केली. नितीन गडकरी यांच्या वकिलाने त्यास विरोध करत न्यायालयात हजर राहण्याची मागणी केली. न्यायालयाने 28 फेब्रुवारी रोजी केजरीवाल यांच्याविरुद्ध समन्स पाठवले होते.